ऍडलेड येथे पार पडलेल्या दिवसरात्र कसोटी सामन्याने भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात झाली. गुलाबी चेंडूने खेळण्यात आलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्सने भारतावर मात केली. ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्स आणि जोश हेजलवुड यांच्या धडाकेबाज गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया संघाच्या खात्यात अजून या दमदार विजयाची नोंद झाली. परंतु याउलट पहिल्या सामन्यातील पराभवामुळे भारतीय संघाची पुढील वाट खडतर झाल्याचे दिसत आहे. अशात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन याने सोशल मीडियाद्वारे भारतीय संघाचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
‘महानायक’ म्हणून संबोधला जाणाऱ्या अमिताभ बच्चनने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे भारतीय संघाला विशेष संदेश दिला आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिले की, “भारतीय संघाने जास्त काळजी करू नये. तो केवळ एक वाईट दिवस होता. आपण नक्कीच दमदार पुनरागमन करू. सर्वांच्या आयुष्यात वाईट दिवस येत असतात. आपण सेट बॅकचे उत्तर कमबॅकने देऊ!!”
T 3758 – Ind v Aust 1st test .. !! Don't worry Team India .. just a bad day .. we shall get back .. we all have bad days .. BUT ..
Set Back ka jawab Comeback se denge !!— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 20, 2020
पहिल्या कसोटी सामन्यातील चुका सुधारण्याची गरज
पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने फलंदाजीसह गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात खराब कामगिरी केली होती. सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियान फलंदाज मार्नस लॅब्यूशानेचे ३ आणि कर्णधार टीम पेनचाही एक झेल सोडला होता. तसेच दुसऱ्या डावात फलंदाजीत भारताची दयनीय अवस्था झाली होती. अवघ्या २२ षटकांमध्येच भारतीय संघाने ९ विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळे ३६ धावांवर भारताने त्यांचा डाव घोषित केला होता.
त्यामुळे दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाला चितपट करायचे असेल, पहिल्या सामन्यात झालेल्या छोट्या छोट्या चुकांना सुधारावे लागणार आहे. याबरोबरच विराट कोहली आणि मोहम्मद शमी उर्वरित तीन सामन्यांत अनुपस्थित असल्यामुळे त्यांची उणीवही संघाला भरुन काढावी लागणार आहे. २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. ३० डिसेंबर रोजी हा सामना संपेल.
महत्त्वाच्या बातम्या-
शमीच्या दुखापतीमुळे ‘या’ वेगवान गोलंदाजाचा मार्ग मोकळा, मिळू शकते कसोटीत पदार्पणाची संधी
हिटमॅनचा ‘हिट’ कारनामा! ३ वर्षांपूर्वी रोहितने केवळ ३५ चेंडूत केली होती शतकी खेळी
‘संधी असूनही फायदा घेता येणार नाही, टीम इंडियाचे पुनरागमन अशक्य’, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा दावा