क्रिकेटमध्ये स्लेजिंग हे काही क्रिकेट चाहत्यांसाठी नवीन नाही. फरक इतकाच की आजकाल खेळाडू स्लेजिंग करत असताना अनेकदा स्टंप माईकमधून त्यांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो. खरंतर क्रिकेट सामन्यांमध्ये स्टंप माईकमधील आवाज महत्त्वाचा असतो. यामुळे पंचांना बॅट चेंडूला लागली की नाही, असे निर्णय देताना मदत होते. पण खेळाडूंचाही स्टंप माईकमधील आवाज बऱ्याचदा ऐकू येतो. त्यामुळे खेळाडूंमधील ऐकू आलेला संवाद नेहमीच चर्चेचा विषय ठरतो.
त्यातही ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास शाब्दिक चकमकी अनेकदा घडताना दिसतात. २०१८-१९ ला जेव्हा भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौरा केला होता, तेव्हा कसोटी मालिकेदरम्यान अनेक शाब्दिक चकमकी झाल्या. या चकमकी स्टंप माईकमधून ऐकूही आल्या. यातीलच काही घटनांचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
४. पंत आणि पेनमध्ये रंगले शाब्दिक युद्ध –
२०१८-१९ ला भारतीय संघाने केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेदरम्यान भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनमध्येही चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले होते. पंत आणि पेन यांच्यातील संवाद स्टंप माईकमधून ऐकू आला होता.
मेलबर्न कसोटीत पहिल्यांदा पेन पंतला स्लेज करताना म्हणाला होता की ‘एमएस धोनी वनडे संघात परत आला आहे. त्यामुळे तू बीबीएलमध्ये हॅरिकेन संघात खेळू शकतो. त्यांना फलंदाजाची गरज आहे.’
‘तूझा ऑस्ट्रेलियातील सुट्टीचा वेळही वाढेल. होबार्ट हे सुंदर शहर आहे. तुला शानदार आपार्टमेंटही मिळेल.’ तसेच तो पुढे म्हणाला, ‘तू माझ्या मुलांना सांभाळू शकतो का, जेणेकरुन मी माझ्या पत्नीला घेऊन चित्रपट पहायला जाऊ शकतो.’
https://twitter.com/cricketcomau/status/1078545482597556224
त्यानंतर पेनने केलेल्या स्लेजचा हिशोब चुकता करतना पंत यष्टीमागून पेनला डिवचताना दिसला. “कमऑन बाॅईज, आपल्याकडे एक खास पाहुणा आला आहे. तो काही करत नाही. मयांक तुला तात्काळ कर्णधार माहीत आहे का? पेनची ही खास उपस्थिती आहे. त्याला विशेष काही करता येत नाही. तो फक्त बडबड करतो. ” असे यावेळी पंत म्हणताना दिसला होता.
https://twitter.com/cricketcomau/status/1078870798318759936
३. लायनने पुजाराला संयमी खेळीसाठी डिवचले –
२०१८-१९ला झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान सिडनी कसोटीत पुजाराने मालिकेतील तिसरे शतक केले होते. त्यावेळी एकदा ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने पुजाराला विचारले होते की ‘तूला अजून फलंदाजी करुन कंटाळा आला नाही का?’ यावर पुजाराने फक्त हसून प्रतिसाद दिला.
https://twitter.com/legsidestrangle/status/1081043730793000960
२. इशांत-लायनमधील गमतीशीर संवाद –
याच मालिकेत पर्थ कसोटीदरम्यान पाचव्या दिवशी भारताचा वेगवान इशांत शर्मा फलंदाजीला आला तेव्हा तो ऑफ स्टम्पला झाकून उभा होता. तेव्हा लायनने त्याला ‘तू ऑफ स्टम्पला झाकून फलंदाजी करणार आहेस का ?’ असे विचारले होते. यावर इशांतने ‘तू मला ऑफ स्टम्पला गोलंदाजी करणार आहे का ?’ असे उत्तर दिले होते. त्यांच्यातील हा संवादही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
https://twitter.com/cricketcomau/status/1074865742170882049
५. पेनने मुंबई इंडियन्सला पाठिंबा देण्यासाठी रोहितला दिली होती ऑफर –
२०१८-१९ ला भारताने केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिका भारताच्या चांगल्या कामगिरीबरोबरच स्टंप माईकमधून येणाऱ्या खेळाडूंच्या आवाजासाठी गाजली होती. याच मालिकेतील आणखी एक गमतीशीर किस्सा असा की मेलबर्न कसोटीत रोहित शर्मा फलंदाजी करत असताना पेन रोहितला म्हणाला, ‘मी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यापैकी कोणाला पाठिंबा द्यावा याबाबत गोंधळलेला असतो. पण जर तू आज षटकार मारला तर मी मुंबईला पाठिंबा देईल.’
https://twitter.com/cricketcomau/status/1078139684654538752
त्याचबरोबर पुढे पेन असेही म्हणाला, ‘पण राजस्थानकडून खूप ऑस्ट्रेलियन खेळाडू खेळतात.’ यावर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज ऍरॉन फिंच म्हणाला, ‘मी पण रॉयल्सकडून खेळलो आहे.’
फिंचच्या या वाक्यावर उत्तर देताना पेन म्हणाला, ‘तू सगळ्याच संघासाठी खेळला आहेस, मित्रा’ त्यावर फिंच म्हणाला ‘फक्त बेंगलोर सोडून’
यावर पेन म्हणाला होता की ‘तू त्या संघाकडून का खेळला नाहीस, विराट कोहलीला तू आवडत नाही का?’. ज्यावर फिंच म्हणाला की, ‘मी कुणालाही आवडत नाही, यामुळे मी एका संघाकडून दुसऱ्या संघाकडे जात असतो.’
https://twitter.com/cricketcomau/status/1207614995493613570
विशेष म्हणजे यावर्षी आयपीएलमध्ये फिंच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून देखील खेळला. हा त्याला आयपीएलमधील एकूण ८ वा संघ ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2021: ‘मिस्टर आयपीएल’ रैनासह ‘हे’ खेळाडू होऊ शकतात चेन्नई सुपर किंग्जमधून आऊट
“बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियावर मात करायची आहे, तर ‘असा’ सराव करा”
मिस्टर क्रिकेटने केली पृथ्वी शॉची पाठराखण; मेलबर्न कसोटीत संधी देण्याची मागणी
ट्रेंडिंग लेख –
‘बॉक्सिंग डे कसोटी’ म्हणजे नक्की आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर
IPL 2021: ‘मिस्टर आयपीएल’ रैनासह ‘हे’ खेळाडू होऊ शकतात चेन्नई सुपर किंग्जमधून आऊट





