पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटी व शेपींग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डीईएस एमएसएलटीए पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन (१६ वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत अमोघ पाटील, सर्वज्ञ सरोदे, पार्थ सापरिया, अझलन शेख यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून पात्रता फेरीच्या तिसऱ्या चरणात प्रवेश केला.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत दुसऱ्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात अमोघ पाटीलने रोनित सचदेवाचा ६-०, ६-३ असा तर, आरव पटेलने अभिनव महामुनीचा ६-३, ६-० असा पराभव करून तिसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश केला. अव्वल मानांकित आराध्य म्हसदेने वीर गुप्ताचे आव्हान ६-२, ६-१ असे मोडीत काढले. अनिश वडनेरकरने किशल्या शर्माला ६-२, ६-२ असे नमविले. चुरशीच्या लढतीत नील बोंद्रेने अथर्व बेलदारचा २-६, ६-२, १०-० असा तीन सेटमध्ये पराभव केला.
अझलन शेखने अरहान पांडेला ६-१, ६-० असे पराभूत केले. सर्वज्ञ सरोदेने वीर चतुरचा ६-४, ६-३ असा तर, लेश्या नायडू याने जयवर्धन वाळेकरचा ६-१, ६-२ असा पराभव करून आगेकूच केली. तिसऱ्या मानांकित पार्थ सापरियाने अनिश घुलेवर ६-२, ६-० असा विजय मिळवला. अरित्रा भट्टाचार्यने वेदांत साळवेचा ५-७, ६-४, १०-६ असा संघर्षपूर्ण पराभव केला. रुद्र शहाने आरव नाईकचा ६-१, ६-४ असा पराभव केला. राज दर्डा याने सोळाव्या मानांकित वेदांत जोशीचा ६-०, ६-१ असा पराभव केला.
निकाल: दुसरी पात्रता फेरी: मुले:
अमोघ पाटील वि.वि.रोनित सचदेवा ६-०, ६-३;
आरव पटेल वि.वि.अभिनव महामुनी ६-३, ६-०;
अनिश वडनेरकर वि.वि.किशल्या शर्मा ६-२, ६-२;
वेदांग चढ्ढा वि.वि.सुजय देशमुख ६-२, ६-२;
स्मित उंद्रे वि.वि.पार्थ दाभिकर ६-१, ६-०;
अरित्रा भट्टाचार्य वि.वि.वेदांत साळवे ५-७, ६-४, १०-६;
रुद्र शहा वि.वि.आरव नाईक ६-१, ६-४;
अंश रमाणी वि.वि.ओम कलशेट्टी ६-०, ६-१;
आराध्य म्हसदे(१)वि.वि.वीर गुप्ता ६-२, ६-१;
नील बोंद्रे वि.वि.अथर्व बेलदार २-६, ६-२, १०-०;
अझलन शेख वि.वि.अरहान पांडे ६-१, ६-०;
राज दर्डा वि.वि.वेदांत जोशी(१६) ६-०, ६-१;
सोहम कांबळे(२)वि.वि.सय्यम पाटील ६-४, ६-०;
नमिश हुड वि.वि.अनय गांधी ६-०, ६-०;
सर्वज्ञ सरोदे वि.वि.वीर चतुर ६-४, ६-३;
लेश्या नायडू वि.वि.जयवर्धन वाळेकर ६-१, ६-२;
पार्थ सापरिया(३)वि.वि.अनिश घुले ६-२, ६-०;