---Advertisement---

‘हा’ दिग्गज बनणार भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक! बांगलादेश दौऱ्याआधी स्वीकारणार जबाबदारी

On: सोमवार, जुलै 3, 2023 8:50 PM
Indian Womens Team
---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघाला अमोल मुजुमदार यांच्या रूपात नवीन मुख्य प्रशिक्षक मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. क्रिकेट सल्लागार समितीला मुजुमदार यांनी प्रभावित केल्याचे सांगितले जात आहे. मागच्या मोठ्या काळापासून भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जागा रिक्त होती, जी मुजुमदार भरू शकतात.

भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अमोल मुजुमदार (Amol Mujumdar) यांच्यासह डहरमचे माजी प्रशिक्षक जॉन लुईस आणि तुषार आरोठे यांची नावे सामील आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार अमोल यांनी सोमवारी (3 जुलै) मुंबईमध्ये या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे आणि सुक्षणा नाईक या क्रिकेट सल्लागार समितीला (CAC) मुलाखत दिली. माहितीनुसार समितीला सर्वाधिक प्रभावित करणारे अनोलच ठरले. त्यामुळे भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांची नियुक्त होऊ शकते.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने अशी माहिती दिली की, “सीएसी अमोलच्या मुलाखतीवर सर्वात जास्त प्रभावित झाली. इतर मुलाखतीही चांगल्या होत्या, पण अमोलची मुलाखत सर्वोत्तम राहिली. या कामासाठी त्यांच्या नावाची निवड केली जाईल, अशीच आशा आहे.”

दरम्यान, अमोल नुकतेच णुंबई रणजी संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिले आहेत. इंडियन प्रीमियर लीगच्या राजस्थआन रॉयल्स आणि दक्षिण आफ्रिका आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाला प्रशिक्षण देण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे. महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी झालेल्या मुलाखतींमध्ये अमोल एकमेव उमेदवार होते, जो प्रत्यक्ष मुलाखत देण्यासाठी उपस्थित राहिले. जुलै महिन्यात भारतीय महिला संघाला बांगलादेश दौरा करायचा आहे. अशात संघाला या दौऱ्यापूर्वी नवीन मुख्य प्रशिक्षक मिळू शकतो, जो शक्यतो अमोल यांच्याच रुपात असेल. भारतीय संघ या दौऱ्यावर मीरपूर्णध्ये तीन टी-20 आणि तीन वनडे सामन्यांच्या मालिका खेळला आहे. (Amol Mujumdar is likely to take charge as the head coach of the Indian women’s team)

महत्वाच्या बातम्या –
गुरुपौर्णिमेला सचिन आचरेकर सरांच्या आठवणीत रमला! 12 खेळाडूंच्या फोटोसह शेअर केली भावूक पोस्ट
ब्रिटिश नागरिकत्व घेऊन आयपीएल खेळणार पाकिस्तानी खेळाडू! स्वतः दिली माहिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---