पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज जुनैद खान याने त्याच्या भारत दौऱ्याशी संबंधित 11 वर्षे जुना किस्सा शेअर केला आहे. यावेळी त्याने विराट कोहली याच्यासोबतच्या त्याच्या वादाबद्दल सांगितले आहे. पॉडकास्टवर बोलत असताना, त्याने सांगितले की, जानेवारी 2013 मध्ये दिल्ली एकदिवसीय सामन्यापूर्वी त्याने विराट कोहलीला इशारा दिला होता. जुनैदने असेही सांगितले की, नंतर त्याने विराटला जो इशारा दिला होता तेच केले.
नादिर शाह पॉडकास्टवर बोलताना जुनैद खान (Junaid Khan) म्हणाला, “मी अनेक फलंदाजांच्या विकेट्स घेतल्या आहेत, पण एक विराट कोहली (Virat Kohli) याच्या विकेटची आठवण आहे. विराट आणि मी अंडर19 वर्ल्ड कपमध्ये एकमेकांविरुद्ध खेळलो आहोत. आम्हा एकमेकांना ओळखतो. ती माझी पुनरागमन मालिका होती. मी भारताविरुद्ध पहिल्यांदाच खेळत होतो. पहिल्या सामन्यात मी कोहलीला बाद केले. त्यानंतर असे पुन्हा होणार नाही, असे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यातही मी त्याला बाद केले. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी मी विराटला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. युनूस भाईने विराटचा झेल घेतला होता.”
डिसेंबर 2012 मध्ये पाकिस्तानचा संघ दोन टी20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात आला तेव्हा जुनैद या दौऱ्याबद्दल बोलत होता. द्विपक्षीय मालिकेसाठी पाकिस्तान संघाची भारत दौऱ्याची ही शेवटची वेळ होती. येथे टी20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली असली तरी एकदिवसीय मालिकेवर पाकिस्तानने कब्जा केला होता. पाकिस्तान संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-1 ने विजय मिळवला होता. या तीनही वनडेमध्ये जुनैद खानने विराट कोहलीला बाद पाठवले होते.
विराट कोहलीविरुद्ध जुनैद खान त्यानेळी किती वरचढ ठरला होता, याचा अंदाज या दोघांचा पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये आमनासामना झाला. यामध्ये जुनैदने विराटला 24 चेंडू टाकले आणि केवळ तीन धावा देताना त्याला तीनदा बाद केले. हे दोन्ही खेळाडू शेवटी 2017 मध्ये आमनेसामने आले होते. (An 11-year-old story told by a Pakistan bowler; He said, ‘I told Virat about your today)
महत्वाच्या बातम्या
सचिनने ‘Sam बहादुर’ सिनेमा पाहताच विकी कौशलची भावूक पोस्ट; म्हणाला, ‘माझ्या बालपणीच्या हिरोने आज माझा…’
दुखापतीमुळे वेदनेने विव्हळत होता पाकिस्तानी स्टार खेळाडू, स्ट्रेचर नसल्यामुळे आली पाठीवर नेण्याची वेळ- Video