आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) महिला टी20 विश्वचषक 2024 साठी अंपायर्सची घोषणा केली आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे या संपूर्ण स्पर्धेत प्रथमच महिला सामना अधिकाऱ्यांचे पॅनल तयार करण्यात आले आहे. मॅच रेफरी असो की पंच, यावेळी महिला टी20 विश्वचषकात फक्त महिलाच सर्व जबाबदाऱ्या सांभाळतील. आयसीसीने घेतलेला हा मोठा निर्णय आहे. यासाठी आयसीसीने आज मंगळवार (24 सप्टेंबर) रोजी 10 पंच आणि 3 सामनाधिकारी यांच्यासह एकूण 13 सामन्यांच्या अधिकाऱ्यांची घोषणा केली आहे.
यंदाच्या महिला टी-20 विश्वचषकला 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. बांग्लादेश येथील सत्तापालट झाल्याने बीसीबीने यजमानपद गमावले. अशा परिस्थितीत आयसीसीने टी-20 विश्वचषक यूएईला हलवले. या मेगा इव्हेंटसाठी, अनुभवी पंचांना देखील पॅनेलमध्ये स्थान मिळाले आहे, ज्यांना आधीच टी20 विश्वचषकातील पंच करण्याचा अनुभव आहे. त्यापैकी क्लेअर पोलोसाक पाचव्यांदा टी20 विश्वचषकात पंच म्हणून काम पाहतील. तर किम कॉटन आणि जॅकलिन विल्यम्स चौथ्यांदा पंचाची जबाबदारी सांभाळतील.
मागील फायनलमध्ये स्यू रेडफर्न टीव्ही अंपायर होत्या. ती चौथ्यांदा मेगा इव्हेंटमध्ये अंपायर होणार आहे. झिम्बाब्वेची सारा दंबवाना या स्पर्धेत प्रथमच सामना अधिकारी म्हणून काम पाहणार आहे. जीएस लक्ष्मी, शांद्रे फ्रिट्झ आणि मिचेल परेरा यांच्याकडे सामनाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. जीएस लक्ष्मी यांना 12 वर्षांचा अनुभव आहे.
आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024 साठी सामना अधिकारी
सामनाधिकारी: शांद्रे फ्रिट्झ, जीएस लक्ष्मी, मिचेल परेरा
सामना पंच: लॉरेन एजेनबॅग, किम कॉटन, सारा डंबनेवाना, अण्णा हॅरिस, निमाली परेरा, क्लेअर पोलोसाक, वृंदा राठी, स्यू रेडफर्न, एलॉइस शेरीडन आणि जॅकलिन विल्यम्स
हेही वाचा-
14 चौकार, 5 षटकार; ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाशिकच्या साहिल पारखची झंझावाती शतकी खेळी
‘मी त्याच्यासारखा कर्णधार..’, आकाश दीपचे रोहित शर्माबाबत लक्षवेधी वक्तव्य!
ind vs ban; हे 4 मोठे विक्रम आर अश्विन दुसऱ्या सामन्यात आपल्या नावे करू शकतो