---Advertisement---

IPL प्लेऑफमध्ये प्रथमच घडलेली घटना, GT स्टारच्या नावावर लाजीरवाणा विक्रम!

---Advertisement---

आयपीएल 2025 (IPL 2025) चा एलिमिनेटर सामना शुक्रवार (30 मे) रोजी गुजरात टायटन्स (GT vs Mi) विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात न्यू चंदिगड स्टेडियममध्ये खेळला गेला. या सामन्यात मुंबईने प्रथम 228 धावा केल्या होत्या. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना गुजरातला कर्णधाराच्या स्वरूपात पहिला झटका बसला. तो पहिल्याच षटकात फक्त एक धाव करून बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शन सोबत श्रीलंका फलंदाज कुशल मेंडीस (Kushal Mendis) फलंदाजी करण्यासाठी आला. सर्वांच्या नजरा आणि आशा त्याच्याकडे होत्या. पण सामन्यादरम्यान तो ज्या पद्धतीने बाद झाला, ते पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला.

मुंबईकडून सातव्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी मिचेल (Mitchel Sentner) सेंटनर आला होता. त्याच्या दुसऱ्या चेंडूवर मेंडीस मागे होऊन लेग साइईडमध्ये शॉट मारण्याचा प्रयत्न करत होता, तो तिथे यशस्वी देखील झाला. पण नंतर शॉट मारताना तो एवढ्या मागे सरकला की त्याचा पाय स्टंपला धडकला, त्यामुळे हिट विकेटच्या स्वरूपात त्याला निराश होऊन परत जावे लागले.

मेंडीस ज्या दरम्यान बाद झाला, तेव्हा संघाचा 6.2 षटकादरम्यान 2 खेळाडू गमावून धावसंख्या 67 होती. मेंडीसने बाद होण्यापूर्वी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत 10 चेंडूत 27 धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने एक चौकार आणि दोन षटकार झळकावले होते.

आयपीएलच्या इतिहासात प्लेऑफ सामन्यांमध्ये हिट-विकेट बाद होऊन परत जाणारा कुशल मेंडीस पहिला खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी कोणताही खेळाडू आयपीएल प्लेऑफ सामन्यांमध्ये हिट-विकेट बाद होऊन परत गेलेला नाही.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---