गुजरात टायटन्स (Gujrat Titans ) विरुद्ध सामन्यात सूर्यकुमार यादवने इतिहास रचला आहे. (Suryakumar yadav record in IPL 2025) सूर्याने जरी अर्धशतक झळकावले नसले, तरीसुद्धा त्याने 20 चेंडूत 33 धावा केल्या. त्याच्या पारीमध्ये सूर्याने 1 चौकार आणि 3 षटकार झळकावले. सूर्यकुमारने या 33 धावांमध्ये सुद्धा एक विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. सूर्या 150 आयपीएल डावानंतर सर्वात जास्त धावा करणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. सूर्याने 150 आयपीएल डावानंतर आत्तापर्यंत एकूण 4,267 धावा केल्या आहेत. तसेच रोहित शर्माने 150 आयपीएल डावानंतर 4129 धावा केल्या होत्या. त्यामुळे सूर्यकुमारने रोहित शर्माचा हा विक्रम मोडला आहे. 150 आयपीएल डावानंतर सर्वात जास्त धावा करणारा भारतीय फलंदाज केएल राहुल (kl Rahul) आहे.
राहुलने 150 आयपीएल डावानंतर एकूण 4522 धावा केल्या होत्या. दुसऱ्या नंबर वर विराट कोहली आहे कोहलीने 150 आयपीएल नंतर 4775 धावा केल्या होत्या. तिसऱ्या स्थानावर सुरेश रैना आहे,तसेच शिखर धवन या यादीमध्ये चौथ्या स्थानावर आहे.
150 आयपीएल डावांतनंतर सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू
5,222 धावा- केएल राहुल.
4,775 धावा-विराट कोहली
4,373 धावा – सुरेश रैना
4,314 धावा- शिखर धवन
4,267 धावा*- सूर्यकुमार यादव
4,210 धावा – गौतम गंभीर
4,166 धावा – अजिंक्य रहाणे
4,129 धावा- रोहित शर्मा
मुंबई इंडियन्सने (mumbai indians) रोहित शर्मा (rohit sharma) आणि जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) 20 धावांनी एलिमिनेटर सामन्यात चांगलाच धुवा उडवला आणि त्यांचा पराभव करत क्वालिफायर दोन मध्ये स्थान निश्चित केले. आता मुंबईचा सामना एक जून रोजी पंजाब किंग्स विरुद्ध होणार आहे. ज्यामध्ये जिंकणारा संघ अंतिम सामन्यात आरसीबी (RCB ) विरुद्ध सामना खेळणार आहे. याचबरोबर गुजरात संघ या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.






