कोरोना वायरसमुळे मागील 7 महिने रखडलेला इंग्लंडचा श्रीलंका दौरा सुरू झाला असून गाले येथे पहिला कसोटी सामना पार पडत आहे. मात्र, हा सामना क्रिकेट पेक्षा एका इंग्लंडच्या प्रेक्षकामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे . इंग्लंडचा एक प्रेक्षक मार्चमध्ये 2020 मध्ये होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी श्रीलंकेत गेला होता. मात्र कोरोना वायरसमुळे मालिका तेव्हा स्थगित करण्यात आली होती. यानंतर त्या प्रेक्षकाने ठरवले की जोपर्यंत श्रीलंकेत तो कसोटी सामना बघणार नाही, तोपर्यंत तो मायदेशी परतणार नाही.
अखेर काही दिवसांपूर्वी जेव्हा मालिकेला सुरुवात झाली तेव्हा तो कसोटी मालिका पाहण्याचे आपले स्वप्न पूर्ण करणारच होता, मात्र तो स्टेडीयममध्ये पोहोचताच त्याला पोलिसांनी बाहेर हाकलून दिले आहे.
इंग्लंडच्या या रॉब लुईस नामक प्रेक्षकाला गालेच्या किल्ल्यावर जाऊन काही वेळ बॅनर फडकवण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र यानंतर जेव्हा तो सामना बघण्यासाठी मैदानात गेला तेव्हा बायोबबल मुळे पोलिसांनी त्याला हकलून दिले.
या सर्व प्रकरणाबद्दल रॉब म्हणाला, ” मी फारच निराश आहे. मी जवळ जवळ दहा महिने हा सामना बघण्यासाठी श्रीलंकेत थांबलो आणि पोलिसांनी मला मैदानाबाहेर हुसकून दिले. मी यासंदर्भात पोलीस प्रमुखांना भेटणार आहे. मला फक्त आणि फक्त सामना बघायचा आहे. त्यांनी मला केवळ अर्धा तास बॅनर फडकवण्याची परवानगी दिली. मला आशा आहे की आगामी दिवसांचा खेळ बघण्यासाठी मला परवानगी मिळेल.”
Anyway, here it is. 10 months of dreaming for this moment. @TheBarmyArmy @englandcricket pic.twitter.com/CeY0P8bMn7
— Rob Lewis (@elitebandwagon) January 14, 2021
कोरोनामुळे गाले येथील मैदानावर प्रेक्षकांना सामना येऊन बघण्यास बंदी आहे व त्यामुळेच रॉबला मैदानाबाहेर हलवण्यात आले. दरम्यान आगामी काळात हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की रॉब सामना बघण्यासाठी काय खटाटोप करतो.
महत्त्वाच्या बातम्या –
शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या नॅथन लायनचे ‘असे’ झाले प्रेक्षकांकडून स्वागत, पाहा व्हिडिओ
नवा आहे पण छावा आहे! वॉशिंग्टनने ‘अशी’ उडवली ऑस्ट्रेलियाच्या धाकड फलंदाजांची दांडी, पाहा व्हिडिओ
सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुनचे मुंबई संघाकडून पदार्पण; बाप-लेकाच्या नावावर झाला खास रेकॉर्ड