---Advertisement---

दोन प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचे असे अनोखे बर्थडे सेलिब्रेशन पाहिले आहे का?

On: बुधवार, जानेवारी 22, 2020 5:53 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात काल (22 जानेवारी) भारतीय संघाने ब्लोएमफोंटेन येथे झालेल्या जपान विरुद्धच्या सामन्यात 10 विकेट्सने विजय मिळवला. विशेष म्हणजे काल भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल आणि जपानचा गोलंदाज केन्टो ओटा-डोबेल यांचा वाढदिवस होता.

त्यामुळे हा सामना संपल्यानंतर भारत आणि जपान संघाने या दोघांचाही एकत्र वाढदिवस साजरा केला. याचा व्हिडिओ आयसीसीच्या क्रिकेट विश्वचषकाच्या अधिकृत ट्विटर हँडेलवर शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की ‘ध्रुव जुरेल आणि केन्टो ओटा-डोबेलच्या वाढदिवसाचे मनोरंजक सेलिब्रेशन.’

या व्हिडिओमध्ये दिसचे की ध्रुव आणि केन्टो एकत्र केक कापत आहेत. यावेळी भारत आणि जपान संघाचे खेळाडूही तिथे उपस्थित आहेत. तसेच केक कापल्यानंतर भारतीय संघाने ध्रुवच्या तोंडाला नंतर केक फासला. केन्टोचा हा 17 वा तर ध्रुवचा 19 वा वाढदिवस होता.

https://twitter.com/cricketworldcup/status/1219620734303121408

त्याचबरोबर याआधी हा सामना संपल्यानंतर प्रियम गर्ग कर्णधार असणाऱ्या भारतीय संघाने जपानलाही ग्रुप फोटो काढण्यासाठी बोलावले होते. त्यामुळे भारतीय संघाने दाखवलेल्या या खिलाडूवृत्तीसाठी सध्या त्यांचे कौतुक होत आहे.

https://twitter.com/cricketworldcup/status/1219605576814075904

नमुद करण्यासारखी गोष्ट म्हणजे जपान पहिल्यांदाच विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे त्यांचा हा विश्वचषकाचा पहिलाच अनुभव आहे.

भारत विरुद्ध जपान संघात काल झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या सामन्यात जपानने प्रथम फलंदाजी करताना 41 धावा केल्या होत्या आणि भारताला 42 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने एकही विकेट न गमावता अवघ्या 4.5 षटकात पूर्ण करत सामना जिंकला.

या विजयामुळे भारताने अंतिम 8 संघातील स्थान निश्चित केले आहे. भारतीय संघाने जपानच्या आधी श्रीलंका संघाला 90 धावांनी पराभूत केले होते. आता भारताचा साखळी फेरीतील अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध 24 जानेवारीला होणार आहे.

https://twitter.com/Maha_Sports/status/1219936193606905862

https://twitter.com/Maha_Sports/status/1219934548852477953

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---