Ranji Trophy: हैदराबादचा युवा फलंदाज तन्मय अग्रवाल याने प्रथम श्रेणी सामन्याच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. तन्मय अग्रवाल सध्या अरुणाचल प्रदेश विरुद्ध रणजी ट्रॉफी सामना खेळत असून या सामन्यात त्याने जबरदस्त त्रिशतक झळकावले आणि अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले. तन्मय अग्रवालने प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्याच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही केला.
तन्मय अग्रवाल (Tanmay Agarwal) याने 147 चेंडूत त्रिशतक पूर्ण केले. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात जलद त्रिशतक ठरले. याशिवाय तन्मयने भारतासाठी सर्वात जलद प्रथम श्रेणी द्विशतक झळकावण्याचा विक्रमही केला. तन्मयने 119 चेंडूत द्विशतक पूर्ण केले. तन्मय आता रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. त्याच्या आधी रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एका डावात इतके षटकार कोणीही मारले नव्हते.
तन्मय अग्रवालने 181 चेंडूत 34 चौकार आणि 26 षटकारांच्या मदतीने 366 धावा केल्या तर हैदराबादने 59.3 षटकात 615 धावा केल्या. यासह तन्मय अग्रवाल आता प्रथम श्रेणी क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. त्याच्या आधी हा विक्रम न्यूझीलंडच्या कॉलिन मुनरोच्या नावावर होता, ज्याने 2014-15 मध्ये नेपियरमध्ये खेळताना 281 धावांच्या खेळीत 23 षटकार ठोकले होते. मात्र, आता तन्मय अग्रवालने हा विक्रम मोडीत काढत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
तन्मय अग्रवालने या सामन्यात आपल्या शानदार खेळीने हैदराबादला खूप पुढे नेले असून संघ जिंकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (An Indian batsman made a world record Patta did what no other batsman in the world could do)
हेही वाचा
अपील न करता अंपायरने दिले आऊट, पाकिस्तान क्रिकेटमध्ये घडली एक रंजक घटना, पाहा व्हिडिओ
‘विराट कोहली असता तर…’, इंग्लंडच्या माजी दिग्गजाने केएल राहुलचे शतक हुकण्याबाबत केले मोठे वक्तव्य