भारतीय संघाचा आज शुक्रवार दि.२९ जूनला आयर्लंड विरुद्ध दुसरा आणि शेवटचा टी-२० सामना होत आहे.
अतिशय महत्वाच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला पहिल्या टी-२० सामन्यात संधी न मिळालेल्या खेळाडूंना या सामन्यात संधी देऊन त्यांना आजमावन्याची संधी आहे.
३ जुलैपासून भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध टि-२० मालिका खेळणार आहे.
सध्या जोरदार फॉर्मात असलेल्या इंग्लंड संघाला रोखण्यासाठी भारतीय संघाचा सर्वोत्तम अकरा खेळाडू मैदानात घेऊन उतरावे लागणार आहे.
आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ७६ धावांनी विजय मिळवत ब्रिटन दौऱ्याची शानदार सुरवात केली आहे.
भारतीय संघासाठी जमेची बाजू अशी की सलामीवीर रोहित शर्माला पहिल्या सामन्यात सुर गवसाला आहे. तसेच फिरकी जोडी चहल-कुलदीप यादव यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत विरोधकांची भांबेरी उडवली.
भारताच्या कर्णधार विराट कोहली पहिला सामना झाल्यानंतर म्हठल्याप्रमाणे या सामन्यात ज्या खेळाडूंना पहिल्या सामन्यात संधी मिळली नाही त्यांना आजच्या सामन्यात संधी देण्यात येण्याची शक्यता आहे.
सलामीवीरांनी पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी केल्याने इंग्लड दौऱ्यात त्यांचा फॉर्म कायम रहावा या हिशोबाने सलामी फळीत बदल होण्याची शक्यता कमी आहे.
आयपीएलमध्ये चांगली कामगिरी कणाऱ्या केएल राहुल आणि दिनेश कार्तिक पैकी एक खेळाडूला सुरेश रैनाच्या जागी संधी मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यात खेळलेल्या मनीष पांडेला फलंदाजीची संधी न मिळाल्याने त्याला संघातून वगळण्याची शक्यता कमी आहे.
तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराहला किरकोळ दुखापत झाल्याने त्याच्या जागी उमेश यादव किंवा सिद्धार्थ कौलला संधी दिली जाऊ शकते.
फिरकी गोलंदाजीत मात्र बदल होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे तिसरा फिरकी गोलंदाज वॉशिंगटन सुंदरला प्रतीक्षा करावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–Video: चतुर धोनीने चहलला करुन दिली या गोष्टीची आठवण!
–कॅप्टन कूल धोनीच्या नावावर जगातील सर्वात कूल विक्रम!