कोलंबो: येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला दुसरा झटका बसला आहे. अर्धशतकी खेळी करणारा केएल राहुल ५७ धावांवर धावबाद झाला आहे.
त्याला दिनेश चंडिमलने धावबाद केले. बाद होण्यापूर्वी त्याने सलग ६ कसोटी डावात ६ अर्धशतके करण्याचा विक्रम केला.
सद्यस्थितीत भारत ३१.४ षटकांत ११४/२ वर आहे. चेतेश्वर पुजारा १८ तर कर्णधार कोहली ३ धावांवर खेळत आहे.






