---Advertisement---

महिंद्रांनी पाळला शब्द! ‘गोल्डन बॉय’ नीरजला भेट दिली ‘स्पेशल XUV700’

---Advertisement---

ऑगस्ट महिन्यात जपानची राजधानी टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी एकमेव सुवर्णपदक जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा हा सध्या भारतातील सर्वात प्रसिद्ध व्यक्ती बनला आहे. त्याने हे ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावल्यानंतर त्याच्यावर अनेकांनी बक्षिसांची खैरात केली होती. त्या वेळी प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील नीरजला एक विशेष बक्षीस देण्याचे घोषित केले होते. रविवारी (३१ ऑक्टोबर) त्यांनी आपले हे बक्षिस नीरजकडे सुपुर्द केले.

खास कार देण्याचे केले होते मान्य
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरीचे कौतुक करण्यासाठी आंदन महिंद्रा यांनी नीरजचे ट्विट करत अभिनंदन केले होते. महिंद्रा हे सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय असतात. त्यांनी नीरजचे अभिनंदन केल्यानंतर एका ट्विटर वापरकर्त्याने आनंद महिंद्रा यांना नीरजला एक्सयुवी ७०० ही आलिशान कार भेट म्हणून देण्याचा सल्ला दिला होता. त्यावर महिंद्रा यांनी तात्काळ रिप्लाय देत त्यांच्या कंपनीतील दोन अधिकाऱ्यांना टॅग करून  नीरजसाठी विशेष कार तयार करण्यास सांगितली होती. त्यानंतर जवळपास अडीच महिन्यानंतर ही कार पूर्ण झाली.

नीरजला मिळाली ती कार
महिंद्रा यांनी ही कार दिल्यानंतर नीरजने कारसह ट्विट केले. त्याने लिहिले,
‘काही खास नावीन्यासह ही कार दिल्याबद्दल धन्यवाद आनंद महिंद्रा जी, लवकरच ही कार फिरवेल.’
महिंद्रा एक्सयुवी ७०० पाच आणि सात सीटर पर्यायांच्या प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे. त्याची किंमत १२.५० लाख रुपयांपासून सुरू होऊन २३ लाखांपर्यंत जाते. या कारवर ८७.५८ अशी अक्षरे लिहीले आहेत. इतक्याच मीटर भालाफेक फेकत नीरजने हे सुवर्णपदक जिंकले होते. तसेच यावर खास भाल्याची प्रतिकृती देखील लावण्यात आली आहे. याचबरोबर पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्ण जिंकणाऱ्या सुमित अंतील याला देखील कार भेट देण्यात आली.

नीरजने जिंकलेले ऐतिहासिक सुवर्णपदक
नीरज चोप्रा याने भारतासाठी हे ऑलिम्पिक इतिहासातील केवळ दुसरे वैयक्तिक सुवर्ण जिंकले. ॲथलेटिक्स प्रकारातील हे भारताचे पहिले सुवर्ण आहे. यापूर्वी नेमबाज अभिनव बिंद्रा याने २००८ बिजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. टोकियो ऑलिम्पिक भारताचे आजवरचे सर्वात यशस्वी ऑलिम्पिक ठरले. भारताने स्पर्धेत एकूण ७ पदके आपल्या नावे केली.

महत्त्वाच्या बातम्या-

कुछ हटके! भारतीय संघाचा अनोख्या पद्धतीने झेल घेण्याच सराव; आयसीसीकडून व्हिडिओ शेअर

विराटने ती गोष्ट करावी, जी धोनी नेतृत्व करताना करायचा, हरजभजन सिंगचा सल्ला

https://mahasports.in/t20-wc-2021-indvsnz-new-zealand-have-won-the-toss-and-have-opted-to-field/

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---