---Advertisement---

‘खूश आहे की कंपनीच्या नावात माही’, धोनीच्या खेळावर आनंद महिंद्राही फिदा

Anand-Mahindra-MS-Dhoni
---Advertisement---

मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ मध्ये ३३ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला होता. या सामन्यात चेन्नईने रोमांचक विजय मिळवला होता. ३ विकेट्सने मिळवलेल्या चेन्नईच्या विजयात एमएस धोनी याने मोलाचा वाटा उचलला. त्याने अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. देशातील मोठे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील धोनीचे कौतुक केले. 

या सामन्यात मुंबईने दिलेल्या १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला अखेरच्या षटकात विजयासाठी १७ धावांची गरज होती. पण, अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जयदेव उनाडकटने ड्वेन प्रीटोरियसला २२ धावांवर बाद केले. पण, नंतर अखेरच्या ४ चेंडूत धोनीने १६ धावा चोपत चेन्नईला विजय मिळवून दिला. यात त्याने एक षटकार, दोन चौकार आणि दुहेरी धावा अशा मिळून १६ धावा काढल्या. धोनीने सामन्यांत १३ चेंडूत नाबाद २८ धावा केल्या.

धोनी अनेक दिवसांनंतर फिनिशरच्या रुपात दिसल्याने अनेकांनी त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली. यात महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी देखील कौतुक केले. त्यांनी ट्वीट केले की, ‘मी फक्त हे सांगू शकतो की, मी खूप खुश आहे की महिंद्रामध्ये माही शब्द येतात. एमएस धोनी शानदार फिनिशर आहे.’

https://twitter.com/anandmahindra/status/1517201290614706179

यावर चेन्नई सुपर किंग्सनेही उत्तर दिले आहे. चेन्नईने लिहिले की, ‘आणि आमच्या मनात आनंद-अम आहे.’ (Anand Mahindra lauds MS Dhoni’s brilliant finish against MI)

https://twitter.com/ChennaiIPL/status/1517245993137631232

महिंद्रा मोठे क्रिकेट चाहते
महिंद्रा हे मोठे क्रिकेट चाहते आहेत. त्यांनी अनेकदा वेगवेगळ्या घटनांवर प्रतिक्रिया यापूर्वीही दिल्या आहेत. इतकेच नाही, तर त्यांनी अनेक युवा क्रिकेटपटूंना महिंद्राच्या महागड्या गाड्या भेट म्हणून दिल्या आहेत. २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी विजयात मोलाचा वाटा उचललेल्या युवा क्रिकेटपटूंना ‘थार एसयूव्ही’ गाडी भेट दिली होती.

चेन्नईचा दुसरा विजय 
चेन्नईसाठी मुंबईविरुद्धचा विजय आयपीएल २०२२ हंगामातील दुसरा विजय होता. यापूर्वी त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध विजय मिळवला आहे. मात्र, पहिल्या ७ सामन्यांपैकी चेन्नईला हे दोनच सामने जिंकता आले आहेत. त्यांना ५ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता त्यांना ८ वा सामना २५ एप्रिलला पंजाब किंग्स विरुद्ध खेळायचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

ब्रेकिंग! प्रविण आमरे यांच्यावर बंदी, तर पंत, ठाकूरवरही मोठी कारवाई; नो बॉलचा वाद आला अंगाशी

IPL 2022| शतक केलं बटलरने आणि निशाण्यावर आला विराट, मीम्स सोशल मीडियावर व्हायरल

‘नक्कीच ते बरोबर नव्हते’, पंतने मान्य केली चूक, तर नो बॉल वादाबद्दल सॅमसन म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---