मुकेश अंबानीचे सर्वात छोटे सुपूत्र अनंत अंबानी आणि प्रसिद्ध उद्योगपती विरेन मर्चंट यांची मुलगी राधिका यांचे प्रीवेडिंग जामनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातील सेलिब्रेटी जामनगर येथे दाखल झाले आहेत. शुक्रवापासून सुरू झालेलं हे प्रीवेडिंग तीन दिवस सुरू राहणार आहे. तर या कार्यक्रमासाठी हॉलीवूड, बॉलीवूडच्या कलाकारांसह अनेक क्रिकेटपटूंनीही देखील उपस्थिती दर्शवली आहे. यात सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या देखील उपस्थित राहिले आहेत.
याबरोबरच भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची जामनगरमधील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सेरेमनीमध्ये जादू पाहायला मिळाली आहे. कारण यावेळी धोनीच्या फोटो आणि व्हिडिओंनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. तसेच या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी धोनी पत्नी साक्षीसोबत जामनगरला पोहोचला आहे. दोघेही तिथे खूप एन्जॉय करत आहेत. चेन्नई सुपर किंग्जमध्ये एकत्र खेळलेल्या ब्राव्होसोबत धोनीने जोरदार डान्स करत यावेळी साक्षी आणि दोघांनाही त्याला साथ दिली आहे. तसेच ब्राव्होने आयपीएलमधून निवृत्ती घेतली असून तो आता चेन्नई संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे.
Video of the Day is here, Our Mahi – Sakshi and DJ Bravo Playing Dandiya !! 🥳😍#MSDhoni #WhistlePodu #Dhoni @msdhoni
🎥 via @instantbolly pic.twitter.com/TQvTiATbKE— TEAM MS DHONI #Dhoni (@imDhoni_fc) March 3, 2024
सोहळ्याच्या पहिल्या दिवशी धोनी ब्लॅक ड्रेसमध्ये दिसला होता. त्यानंतर रात्री जेव्हा म्युझिकल शो आयोजित करण्यात आला तेव्हा माही फिकट पिवळ्या कुर्त्यामध्ये पहायला मिळाला आहे. यावेळी ब्राव्होने पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. तसेच या सोहळ्यात धोनीशिवाय भारताचे अनेक स्टार खेळाडूही दिसले आहेत. महान फलंदाज सचिन तेंडुलकरशिवाय टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनीही सहभाग घेतला आहे.
https://twitter.com/TheDhoniEra/status/1764115297240277033
दरम्यान, धोनी आयपीएलच्या 17 व्या मोसमापासून ऍक्शनमध्ये परतणार असून त्याने 2020 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तेव्हापासून माही फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे. असे असूनही त्याच्या कामगिरीत आणि फिटनेसमध्ये कोणतीही घट झालेली नाही. तसेच धोनीने चेन्नईला आयपीएलमध्ये पाच वेळा चॅम्पियन बनवले असून गेल्या मोसमात चेन्नईने गुजरात टायटन्सविरुद्ध फायनल जिंकली होती.
महत्वाच्या बातम्या –
- रोहित शर्माला 3 ICC ट्रॉफी जिंकण्याची संधी, 15 महिन्यांत करू शकतो मोठा पराक्रम
- अजित आगरकर श्रेयस अय्यरच्या या कृतीमुळे संतापले होते का? अहवालात समोर आले मोठे कारण