fbpx
Saturday, January 23, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

६०० कसोटी विकेट्स घेणाऱ्या जेम्स अँडरसनच्या यशाचे हे आहे रहस्य

August 30, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने काही दिवसांपूर्वीच ६०० कसोटी विकेट्सचा टप्पा पार केला. तो ६०० कसोटी विकेट्स घेणारा पहिला वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे आता ३८ वर्षीय अँडरसनची आता ७०० कसोटी विकेट्सवर नजर आहे. गेली १७ वर्षे अँडरसन आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. कोणत्याही वेगवान गोलंदाजासाठी इतकी वर्षे सातत्याने खेळत रहाणे सोपी गोष्ट नसते. तरीही अँडरसनने ते करुन दाखवले आहे. वेगवान गोलंदाज म्हणून काम करणाऱ्या अँडरसनच्या गोलंदाजीत काय विशेष आहे ते जाणून घेऊया.

अँडरसनच्या यशाबद्दल माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट तज्ज्ञांचे मत

स्मुद अँक्शन प्रभावी बनविते

अतुल वासन टाईम्स ऑफ्स इंडियाशी बोलताना म्हणाले “तुम्ही अँडरसनच्या स्मुद गोलंदाजीची कृती पाहा, दशकापूर्वी त्याने काही महत्त्वपूर्ण बदल केले होते. या बदलामुळे त्याला अधिक वयापर्यंत खेळण्यास मदत मिळत आहे”.

अँक्शनमध्ये काय विशेष आहे

अँडरसन खेळपट्टीवर सहज धावतो आणि त्याची उडीही जास्त नाही आणि लँडिंग देखील योग्य आहे. त्याच्या अँक्शनबद्दल जसे बोलले जाते तशीच ती छान आहे. यामुळे त्यांच्या शरीरावर कोणतेही अतिरिक्त दबाव तयार होत नाही, जे त्यांच्या दीर्घकाळ खेळण्यास उपयुक्त ठरते.

अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये स्वत: ला स्थापित करण्याच्या त्याच्या योजनांवर बरेच आधी काम करू लागला. स्वत:ला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी अँडरसनने ५ वर्षांपूर्वी एकदिवसीय क्रिकेट सोडले आणि कसोटीवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आणि १० वर्षांपूर्वी त्याने टी२० क्रिकेट सोडले होते.

अँडरसन कोणत्याही लीग क्रिकेटमध्ये खेळत नाही

जगभरातील क्रिकेटपटू पैसे मिळविण्याच्या उद्देशाने जगभरात खेळल्या जाणार्‍या टी२० लीगमध्ये भाग घेतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह लीग क्रिकेट खेळत असताना आपल्याला नक्कीच पैसे मिळतात, परंतु शरीराला त्याची किंमत देखील मोजावी लागते. त्यामुळे दुखापत आणि तंदुरुस्तीशी संबंधित समस्या येतात. अँडरसन कधीही कोणत्याही लीग क्रिकेटमध्ये खेळला नाही.

मुरलीधरनचे ८०० विकेट्स आणि सचिनची १०० शतके एवढीच महान कामगिरी आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये अँडरसनने घेतलेले ६०० विकेट्स, दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या ८०० कसोटी विकेट्स किंवा सचिन तेंडुलकरच्या १०० आंतरराष्ट्रीय शतकांच्या विक्रमाच्या बरोबरीचे असल्याचे वासनने म्हटले आहे. हे साध्य करण्यात मोठा त्याग लपलेला आहे. वेगवान गोलंदाजासाठी १७ वर्षे क्रिकेट खेळून १५६ कसोटी सामन्यांमध्ये भाग घेणे ही मोठी गोष्ट आहे.

 


Previous Post

पाकिस्तान क्रिकेटरच्या चुकीमुळे संघ संकटात, मोडला आयसीसीचा मोठा नियम

Next Post

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी असा आहे १७ जणांचा न्यूझीलंड संघ; या २ खेळाडूंचे झाले पुनरागमन

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ IndSuperLeague
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : ईस्ट बंगालला हरवित मुंबई सिटीची घोडदौड कायम

January 23, 2021
Photo Courtesy: www.iplt20.com
क्रिकेट

“मला कोहलीच्या विरुद्ध काही बोलायचे नाही, परंतु…” गौतम गंभीरची विराटवर टीका

January 23, 2021
क्रिकेट

आर आश्विनने भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्रींची केली नक्कल, बघा व्हिडिओ 

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

मोहम्मद सिराजला ५ विकेट्स मिळाव्या म्हणून ‘या’ खेळाडूने देवाकडे केली होती प्रार्थना 

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

विराट ऐवजी अजिंक्य रहाणेला करा कसोटी संघाचा कर्णधार, इंग्लंडच्या दिग्गजाची मागणी

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/BBL
क्रिकेट

दिल्ली संघाने रिलीज केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झळकावले ‘त्याने’ शानदार शतक

January 23, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ICC

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी असा आहे १७ जणांचा न्यूझीलंड संघ; या २ खेळाडूंचे झाले पुनरागमन

Photo Courtesy: Twitter/ mipaltan

मुंबई इंडियन्स फॅन्स! अशी आहे तूमच्या आवडत्या संघाची नवीन जर्सी

Photo Courtesy: Twitter/ ICC

विश्वविजेता कर्णधार मॉर्गन म्हणतोय, 'या' खेळाडूंना आगामी विश्वचषकांसाठी सिद्ध करण्याची ही चांगली संधी

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.