इंडियन प्रिमीअर लीगच्या (आयपीएल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही. त्यांना ३ वेळा आयपीएलच्या उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले आहे. गतवर्षी तर आरसीबी लीगच्या सर्व संघांमध्ये सर्वात खालच्या क्रमांकावर होता. त्यांच्या या दुर्गतीसाठी थोडाफार कोलकाता नाईट रायडर्सचा आंद्रे रसल हा जबाबदार होता.
२०१९च्या आयपीएलच्या १२व्या हंगामात आरसीबी आणि केकेआर २ वेळा आमनेसामने आले होते. आरसीबीने केकेआरला दोन्ही सामन्यात २०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य दिले होते आणि दोन्ही सामन्यात आरसीबीचा विजय पक्का दिसत होता. मात्र, ५ एप्रिल २०१९च्या सामन्यात रसेलने त्याच्या दमदार खेळीने कोलकाता संघाला पराभवाच्या छायेतून बाहेर काढत सामना जिंकून दिला होता.
रसेलच्या सांगितले की, “जर आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने सामन्यादरम्यान ती हरकत केली नसती. तर, मी एवढे चांगले प्रदर्शन करू शकलो नसतो.” Andre russell batted well against royal challengers benglore due to virat kohlis action.
आयसीबीने त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत २० षटकात ३ बाद २०५ धावा केल्या होत्या. यावेळी आयसीबीच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरने १५.४ षटकात ४ बाद १३९ धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी रसेल मैदानावर उतरला. त्याच्या दुसऱ्या बाजूला दिनेश कार्तिक फलंदाज होता. त्यांना संघाला विजय मिळवून देण्यासाठी २६ चेंडूत ६७ धावा करायच्या होत्या.
दोघांनी ८ चेंडूत १४ धावा केल्या. पण, १७व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कार्तिकची विकेट पडली होती. यावर रसेल म्हणाला, “मला आठवत आहे कार्तिक चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला होता. त्यानंतर तो मैदानाच्या बाहेर जात असताना मी पाहिले की, विराट स्टँड्सच्या बाजूला गेला आणि जिथे सर्व खेळाडूंच्या पत्नी आणि केकेआरचे समर्थक बसले होते. त्या बाजूला पाहून ओरडला, कम ऑन.”
विराटच्या या वागण्याला पाहून रसेल चांगलाच संतापला. त्याने या गोष्टीचा बदला घ्यायचे ठरवले. रसेल म्हणाला, “कार्तिक बाद झाल्यानंतर शुभमन गिल फलंदाजीसाठी आला होता. तेव्हा मी त्याला सांगितले होते की, तुला जेवढे जमेल तेवढे मला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न कर. माझ्यासमोर येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाच्या चेंडूवर मला फटकेबाजी करायची आहे. तू फक्त मला जास्त खेळू देण्याचा प्रयत्न कर.”
“जेव्हाही मी षटकार मारत होतो. तेव्हा मी गुणफलकाकडे नाही गिलकडे बघत होतो. षटकार मारल्यानंतर आम्ही दोघे जवळ यायचो आणि एकमेकांच्या मुठीला मुठी मारून खूश व्हायचो. त्यानंतर परत मी क्रिजकडे जाताना मोठा श्वास घ्यायचो. यामुळे मला शांत राहण्यास मदत व्हायची,” असेही रसेलने सांगितले.
त्या सामन्यात रसेलने १३ चेंडूत ४८ धावांची तूफान खेळी केला होती. यात त्याच्या ७ षटकारांचा आणि एका चौकाराचा समावेश होता. त्याच्या खेळीमुळे केकेआरने तो सामना ५ विकेट्सने जिंकला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
रवी शास्त्री अडकले अलिबागमध्ये, आता घेणार बीअरचा आनंद
जीवनातील या ८ महत्त्वाच्या गोष्टी, ज्या धोनीकडून आहेत शिकण्यासारख्या
धोनीने कुत्र्याकडून करुन घेतला कॅचचा जोरदार सराव, साक्षी मात्र या…