---Advertisement---

व्हिडिओ : वाईड म्हणून सोडला चेंडू आणि पायामागून झाला बोल्ड, रसेल झाला अजब पद्धतीने बाद

On: गुरूवार, एप्रिल 22, 2021 3:16 PM
---Advertisement---

वानखेडे स्टेडियमवर बुधवारी (२१ एप्रिल) रंगलेल्या सामन्यात आंद्रे रसल नावाचे वादळ आले होते. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या हाय स्कोरिंग सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने १८ धावांनी विजय मिळवला. तसेच आंद्रे रसलची तुफान फटकेबाजी देखील पाहायला मिळाली होती. या फटकेबाजीला पूर्णविराम देत, सॅम करनने त्याला चपळाईने बाद केल्याचे दिसून आले आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाने दिलेल्या २२१ धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघातील मुख्य फलंदाज लवकर माघारी परतले होते. संघाच्या धावा ३१ असताना कोलकाता संघाने ५ गडी गमावले होते. त्यानंतर आंद्रे रसलने तुफान फटकेबाजी करत अवघ्या २२ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. यात त्याने ६ गगनचुंबी षटकार आणि ३ चौकार लगावले होते.

मात्र त्यानंतर १२ व्या षटकात त्याला सॅम करनने, चपळाईने त्याच्या त्रिफळा गुल केल्या होत्या. रसल स्ट्राइक वर आल्यावर धोनीने क्षेत्ररक्षणात काही बदल केले होते. त्याने ऑफ साईडच्या दिशेने ३ क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवले होते. त्यामुळे रसेलला वाटू लागले होते की तो यॉर्कर चेंडू टाकणार आहे. परंतु त्याने लेग साइडच्या दिशेने चेंडू टाकला, जो रसेलला वाटला की, वाईड चेंडू आहे पण तो चेंडू जाऊन त्याच्या यष्टीला धडकला होता.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने २० षटक अखेर ३ गडी बाद २२० धावा केल्या होत्या. यामध्ये फाफ डू प्लेसिने ४ षटकार आणि ९ चौकार लगावत ९५ धावांची नाबाद खेळी केली होती. तसेच ऋतुराज गायकवाडने ६४ धावांची खेळी केली. चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना, पॅट कमिन्सने ६६ धावांची तुफानी खेळी केली. यात त्याने ४ चौकार आणि तब्बल ६ षटकार लगावले होते. तसेच आंद्रे रसलने ५४ आणि दिनेश कार्तिकने ४० धावांची खेळी करत सामना जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडल्याने हा सामना चेन्नई संघाने १८ धावांनी आपल्या नावावर केला.

महत्वाच्या बातम्या:

रोहित-धोनीनंतर आता मॉर्गनवर देखील होणार कारवाई, हे आहे कारण

पॅट कमिन्सने सॅम करनला एकाच षटकात ठोकल्या ३० धावा, गेल-रैना-कोहली यांच्या पंक्तीत मिळवले स्थान

ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत भारतीय खेळाडू आघाडीवर, पाहा कोणाचा आहे टॉप ५ मध्ये समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---