इंडियन प्रीमियर लीगचा पंधरावा हंगाम (आयपीएल २०२२) सध्या मुंबई येथे खेळला जात आहे. यातील सहाव्या सामन्यात बुधवारी (३० मार्च) कोलकाता नाईट रायडर्स रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (KKRvRCB) हे संघ आमनेसामने आले. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात केकेआरला पराभवाचे तोंड पाहावे लागले. मात्र, हा सामना केकेआरचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल (Andre Russell) याच्यासाठी संस्मरणीय ठरला. त्याचा हा टी२० क्रिकेटमधील ४०० वा सामना होता. या सामन्यानंतर त्याने केक कापून हा क्षण साजरा केला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
केक कापून केले सेलिब्रेशन
आंद्रे रसेल याच्या ४०० व्या सामन्याचे खास सेलिब्रेशन कोलकाता नाईट रायडर्सकडून करण्यात आले. सामन्यानंतर संघ हॉटेलवर पोहोचल्यानंतर केक कापून सेलिब्रेशन केले गेले. त्यावेळी बोलताना रसेल म्हणाला,
“मला माहीत नव्हते हा माझा ४०० वा टी२० सामना आहे. सुनील नरीनने मला याची कल्पना दिली. हा खरच एक मोठा क्षण आहे.”
400 T20s – A special milestone deserved a special celebration 💜💛@Russell12A • #KnightsInAction presented by @glancescreen | #KKRHaiTaiyaar #IPL2022 pic.twitter.com/mXRGcKZ1T7
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 31, 2022
त्याचवेळी त्याला कोणीतरी आतापर्यंत किती षटकार मारले असशील? असा प्रश्न विचारल्यानंतर त्याने २००० असे हसत उत्तर दिले.
चारशे सामने खेळणारा सहावा क्रिकेटपटू
आंद्रे रसेल सर्व प्रकारचे ४०० टी२० सामने खेळणारा सहावा क्रिकेटपटू आहे. यापूर्वी वेस्ट इंडीजच्या कायरन पोलार्ड (५८२), ड्वेन ब्रावो (५२४) व ख्रिस गेल (४६३) यांनी ४०० पेक्षा जास्त टी२० सामने खेळले आहेत. पाकिस्तानचा शोएब मलिक व इंग्लंडचा रवी बोपारा यांनी देखील अनुक्रमे ४७२ व ४११ सामने खेळले आहेत. त्याचवेळी १०० पेक्षा कमी फर्स्ट क्लास व लिस्ट ए सामने खेळताना ४०० टी२० खेळणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे.
महत्वाच्या बातम्या-