इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामने युएईमध्ये सुरू आहेत. या स्पर्धेतील ३१ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ९ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघातील गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली होती. कोलकाता नाईट रायडर्स संघातील वेगवान गोलंदाज आंद्रे रसलने एबी डिविलियर्सला बाद करण्यासाठी टाकलेल्या यॉर्कर चेंडूचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला साजेशी सुरुवात करण्यात अपयश आले होते. संघातील मुख्य फलंदाज लवकर माघारी परतले होते. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर एबी डिविलियर्स फलंदाजी करण्यासाठी आला होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या समर्थकांना त्याच्याकडून मोठ्या आशा होत्या. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाची स्थिती या सामन्यात खूप नाजूक होती. परंतु, तो देखील चांगली कामगिरी करण्यास अपयशी ठरला.
तर झाले असे की, पहिल्या डावातील ९ वे षटक टाकण्यासाठी आंद्रे रसल गोलंदाजीला आला होता. त्याने या षटकातील पहिल्याच चेंडूवर श्रीकर भरतला बाऊन्सर चेंडूवर बाद केले. त्यानंतर षटकातील चौथ्या चेंडूवर एबी डिविलियर्सला असा काही वेगवान यॉर्कर चेंडू टाकला जो, एबी डिविलियर्सच्या पॅडला स्पर्श होऊन यष्टीला जाऊन धडकला. हा चेंडू पाहून एबी डिविलियर्स देखील आश्चर्यचकित झाला. डिविलियर्सला या डावात १ चेंडू खेळून एकही धाव करता आली नाही.
या गोलंदाजांनी डीविलियर्सला पहिल्याच चेंडूवर केले आहे बाद
एबी डिविलियर्स हा टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. तो कुठल्याही चेंडू सीमारेषेच्या बाहेर मारण्यास सक्षम आहे. त्यामुळे त्याला बाद करणे हे प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्नं असते. एबी डिविलियर्सला ॲल्बी माॅर्कलने २००८ मध्ये गोल्डन डकवर बाद केले होते. तर सुदीप त्यागिने २००९, जॅक कॅलिसने २०१२, केन रिचर्डसनने २०१४, मोझेस हेन्रिक्सने २०१५ मध्ये आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात आंद्रे रसलने एबी डिविलियर्सला गोल्डन डकवर बाद केले आहे.
https://twitter.com/ak_sr10/status/1439965901567180804?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1439965901567180804%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fkrida%2Fipl%2Fipl-2021-kkr-vs-rcb-ab-de-villiers-gets-cleaned-up-by-a-peach-yorker-andre-russell-watch-video-sbj86
या सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. ज्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ९२ धावांवर संपुष्टात आला होता.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघातील सलामीवीर फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली होती. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाने हा सामना ६० चेंडू आणि ९ गडी शिल्लक असतानाच आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या –
बंगळूरूला चारीमुंड्या चीत करत कोलकाताने नोंदवला आयपीएलच्या इतिहासातील मोठा ‘सांघिक रेकाॅर्ड’
‘आयपीएलमध्ये कोणाकडे तीक्ष्ण मेंदू असेल तर तो एमएस धोनीकडे आहे’, सेहवागने उधळली स्तुतीसूमने
कर्णधारपद सोडण्यापूर्वी विराट आरसीबीला विजेतेपद पटकावून देईल का? चहलने दिले उत्तर