वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश यांच्यात शुक्रवार रोजी (२९ ऑक्टोबर) आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ चा २३ वा सामना पार पडला. इतर सामन्यांप्रमाणे या सामन्यातही वेस्ट इंडिजचे खेळाडू खराब लयीत दिसले. परंतु जेमतेम त्यांनी शेवटच्या चेंडूवर ३ विकेट्सने बाजी मारत स्पर्धेतील त्यांचे आव्हान कायम ठेवले आहे. या सामन्यादरम्यान वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल याने चाहत्यांना अत्यंत निराश केले. मधल्या फळीत संघाला त्याच्याकडून मजबूत खेळीची अपेक्षा असताना तो साधा एक चेंडूही न खेळता दुदैर्वीरित्या आपली विकेट गमावून बसला.
त्याचे झाले असे की, वेस्ट इंडिजच्या डावादरम्यान १३ व्या षटकात कर्णधार कायरन पोलार्ड रिटायर्ड हर्ट घेऊन मैदानाबाहेर पडला. यावेळी पोलार्ड बाहेर जाताच आंद्रे रसेल फलंदाजीसाठी मैदानावर आला. या षटकातील तस्किन अहमदच्या चौथ्या चेंडूवर वेस्ट इंडिजच्या स्ट्राईकवरील फलंदाज रोस्टन चेजने साधारण शॉट खेळला. त्याने मारलेल्या शॉटचा चेंडू गोलंदाजाच्या पायातील बूटांना लागून नॉन स्ट्राईकवरील यष्टीला जाऊन धडकला.
दुर्देवाने याक्षणी नॉन स्ट्राईकवर उभा असलेला आंद्रे रसेल खेळपट्टीवरील सीमारेषेपासून दूर उभा होता. यामुळे त्याला धावबाद देण्यात आले. अशाप्रकारे एकाही चेंडूचा सामना न करता रसेलला पव्हेलियनला परतावे लागले. यासह तो टी२० विश्वचषकाच्या इतिहासात एकही चेंडू न खेळताना बाद होणारा नववा फलंदाज बनला आहे.
अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलनेही (आयसीसी) त्याच्या या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याच्या अशाप्रकारे धावबाद होण्याच्या पद्धतीला पाहून चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी त्याला दुर्भाग्यशाली क्रिकेटपटू संबोधले आहे.
https://www.instagram.com/reel/CVnFKvwlR0Y/?utm_source=ig_web_button_share_sheet
आंद्रे रसेलची विकेट गेल्यानंतर निकोलस पूरनने या सामन्यात फिनिशरची भूमिका बजावली. त्याने २२ चेंडूंमध्ये ४० धावांची ताबडतोब खेळी करत बांगलादेशला १४३ धावांचे आव्हान देण्यात मोलाचे योगदान दिले. प्रत्युत्तरात बांगलादेशचे फलंदाज निर्धारित २० षटकांमध्ये १३९ धावांपर्यंतच मजल मारू शकले. त्यामुळे वेस्ट इंडिजने ३ धावांनी हा सामना खिशात घातला. यासह बांगलादेशचा संघ टी२० विश्वचषकाच्या बाद फेरीच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘जावया’ला चीयर करण्यासाठी दुबईत पोहोचला शाहीद आफ्रिदी, मुलींनाही नेलं सोबत; फोटो व्हायरल
‘बुमराहवर जास्त अवलंबून राहू नका’, मुरलीधरनचा टीम इंडियाला मोलाचा सल्ला