---Advertisement---

Video: रसलची तुफानी फलंदाजी! सहा गगनचुंबी षटकारांसह झळकावले सीपीएल इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक

On: शनिवार, ऑगस्ट 28, 2021 11:58 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा उर्वरित सामन्यांचा थरार येत्या १९ सप्टेंबर सुरू होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व संघ कसून सराव करत आहेत. दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नुकत्याच सुरू असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत आंद्रे रसल तुफान फटकेबाजी करत आहे. तसेच त्याने या स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतक देखील झळकावले आहे.

शुक्रवारी (२७ ऑगस्ट) सेंट लुसिया किंग्ज आणि जमायका थलावास या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पहायला मिळाला. या सामन्यात जमायका थलावास संघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या आंद्रे रसलने अवघ्या १४ चेंडूंमध्ये तुफानी अर्धशतक झळकावले आहे. त्याने या डावात ३ चौकार आणि ६ गगनचुंबी षटकार लगावले. हे कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जलद शतक आहे. यापूर्वी हा विक्रम जेपी ड्यूमिनीच्या नावावर होता. त्याने १५ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते.

रसेल टी -२० इतिहासातील पहिलाच असा खेळाडू ठरला आहे. ज्याने दोन वेळेस १४ चेंडूंमध्ये ५० धावा करण्याचा पराक्रम केला आहे. यापूर्वी त्याने लंका प्रीमियर लीग स्पर्धेत १४ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते.

या सामन्यात सेंट लुसिया किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून जमायका थलावास संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. जमायका थलावास संघातील फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत २० षटकअखेर ५ बाद २५५ धावांचा डोंगर उभारला होता. यादरम्यान आंद्रे रसलने सर्वाधिक ५० तर लुईसने ४८ आणि वॉल्टनने ४७ धावांचे योगदान दिले.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सेंट लुसिया किंग्ज संघातील सलामीवीर फलंदाजांना साजेशी सुरुवात करून देण्यात अपयश आले होते. दोघेही फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. त्यानंतर टीम डेविडने एकहाती ५६ धावांची खेळी केली. परंतु, त्याला इतर कुठल्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. सेंट लुसिया किंग्ज संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १३५ धावांवर संपुष्टात आला. हा सामना जमायका संघाने १२० धावांनी आपल्या नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या – 

धावांचा रतीब घालणारा रूट फलंदाजी करताना कधीच घालत नाही टोपी, ‘हे’ आहे कारण

“इंग्लिश गोलंदाजांनी पुजाराबाबत कोणतीही चूक करू नये”

चेतेश्वर पुजाराचा तो शॉट पाहून अंपायरही घाबरले, भीतीपोटी असं वाचवलं स्वत:ला, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---