वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल हा सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयपीएलचा तेरावा हंगाम खेळण्यात व्यस्त आहे. तो आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सदस्य आहे.
दिनेश कार्तिकच्या नेतृत्त्वाखालील कोलकाता संघ हंगामातील २२ सामन्यांनंतर गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र संघाच्या या यशात रसेलचे जास्त योगदान नाही. या हंगामात रसेलने खेळलेल्या ४ सामन्यात १२.५०च्या सरासरीने फक्त ५० धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना फक्त ५ विकेट्स घेतल्या आहेत.
रसेलच्या या खराब प्रदर्शनामुळे एका चाहत्याने त्याची पत्नी जॅसिम लोराला सोशल मीडियावर ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण तिने त्या चाहत्याला चांगलेच प्रत्युत्तर दिले. झाले असे की, लोराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा एक फोटो शेअर केला. त्यावर एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “जॅसिम काकू कृपा करुन तुम्ही दुबईला या. कारण इकडे रसेल चांगल्या फॉर्ममध्ये नाही.” यावर लोराने प्रत्युत्तर देत म्हटले की, “आंद्रे रसेल सर्वश्रेष्ट फॉर्ममध्ये आहे.”
https://www.instagram.com/p/CF52k7WlQ1e/?utm_source=ig_web_button_share_sheet
रसेलची पत्नी लोरा ही दरवर्षी आयपीएलच्या कालावधीदरम्यान त्याच्यासोबत राहत असायची. मात्र यावेळी कोरोना व्हायरस महामारीमुळे तिने युएईला न जाण्याचा निर्णय घेतला. तसेच ती नुकतीच आई झाली आहे. त्यामुळे ती घरी राहून तिच्या लहान बाळाचा सांभाळ करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाब संघ का देत नाहीये ‘युनिव्हर्सल बॉस’ गेलला संधी?, प्रशिक्षकाने सांगितले कारण
“‘या’ गोष्टीनंतर आमचा विजय अशक्य होता,” हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर केएल राहुलचं वक्तव्य
किती ते दुर्दैव! ज्याच्यासाठी पंजाबने सर्वाधिक १० कोटी खर्च केले, ‘तोच’ आता ठरलाय सुपर डुपर फ्लॉप
ट्रेंडिंग लेख-
किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला
हैदराबादने एकहाती जिंकला सामना; जाणून घ्या पंजाबच्या पराभवाची ५ कारणे






