---Advertisement---

अजबच! ३०० पेक्षाही अधिक टी२० सामने खेळलेल्या आंद्रे रसलचा ‘या’ अनोख्या आंधश्रद्धेवर विश्वास

On: शनिवार, एप्रिल 24, 2021 6:45 PM
---Advertisement---

जगातील कोणताही खेळाडू हा त्याच्या खेळातील त्याने स्वतः केलेल्या कामगिरीमुळे ओळखला जातो. परंतु यामध्ये काही खेळाडू असे आहेत जे आपल्या चांगल्या आणि वाईट कामगिरीसाठी अंधश्रद्धा कारणीभूत ठरवतात. असे अंधश्रद्धा मानणारे खेळाडू फक्त भारतातच नसून सर्व जगात आहेत. त्यामध्ये सध्या चालू असलेल्या आयपीएलमध्येही कोलकाता नाईट रायडर्सच्या दोन खेळाडूंनी ते सामन्यादरम्यान मानत असलेल्या अंधश्रद्धेच्या गोष्टीबाबत खुलासा केला आहे.

यामध्ये एक खेळाडू आहे कोलकाता संघातील अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल आहे. या खेळाडूला भलेभले गोलंदाज घाबरतात. या खेळाडूने 300 पेक्षा जास्त टी20 सामने खेळले असूनसुद्धा हा खेळाडू अंधश्रध्देवर विश्वास ठेवतो. या संघातील त्याचा सहकारी शिवम मावी सोबत बोलताना त्याने याबाबत खुलासा केला.

अंधश्रद्धेबाबत बोलत असताना आंद्रे रसेलने सांगितले की, “जेव्हा मी खेळण्याकरिता मैदानात उतरतो तेव्हा पहिल्यांदा डावा पाय मैदानात ठेवतो.” दुसरी अंधश्रद्धा सांगत असताना तो म्हणाला की, “जेव्हा मी फलंदाजी करत असतो तेव्हा फलंदाजाचा सामना करण्याअगोदर बॅटला चार वेळा जमिनीवरती ठोकतो. कारण मला वाटते की मी जर असे केले नाही तर माझी कामगिरी चांगली होणार नाही.”

कोलकाता संघातील या अष्टपैलूने चेन्नई सुपर किंग्स विरूद्धच्या सामन्यात स्फोटक फलंदाजी केली होती. यामध्ये त्याने 22 चेंडूत 54 धावा कुटल्या होत्या. परंतु या सामन्यात त्याच्या संघाला 18 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

रसेलने आपल्या अंधश्रद्धेबाबत सांग्तल्यानंतर 22 वर्षीय भारतीय खेळाडू शिवम मावीनेही आपल्या खुलासा केला की तो मैदानात उतरताना पहिल्यांदा उजवा पाय मैदानात ठेवतो.

महत्त्वाच्या बातम्या –

संघर्ष करत असलेल्या राजस्थान रॉयल्यच्या ताफ्यात दाखल होऊ शकतो दक्षिण आफ्रिकेचा ‘हा’ दिग्गज फलंदाज

स्वप्नांना सोडू नका, त्यांचा पाठलाग करा, ती नक्कीच पूर्ण होतील…

युवराजने सचिनला दिल्या वाढदिवसाच्या हटके अंदाजात शुभेच्छा, शेअर केला हृदयस्पर्शी क्षणांचा खास व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---