कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान हा बॉलिवूडचा बादशाह मानला जातो. तो वर्षानुवर्षे हिंदी चित्रपट सृष्टीवर राज्य करतोय. आता शाहरुख खाननंतर त्याच्या संघातील एक अष्टपैलू खेळाडू बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. केकेआरचा स्फोटक खेळाडू आंद्रे रसेल याला एका हिंदी म्युझिक व्हिडिओमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.
विशेष म्हणजे, आंद्रे रसेलच्या या पदार्पणाला क्रिकेट कनेक्शन आहे. रसेल पलाश मुच्छलच्या म्युझिक व्हिडिओमध्ये काम करणार आहे, जो भारतीय स्टार महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचा बॉयफ्रेंड आहे. पलाश संगीत दिग्दर्शकासोबतच चित्रपट दिग्दर्शकही आहे. पलाशनं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आंद्रे रसेलचा एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये त्यानं हातात कॅमेरा क्लॅप पकडला आहे. यावर ‘लडकी तू कमाल की’ असं लिहिलंय. हा एक म्युझिक व्हिडिओ आहे. पलाशनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, “मी यासाठी खूप उत्साहित आहे. तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट राहा.”
पलाशच्या या फोटोवर चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. रसेलला या अवतारात पाहण्यासाठी ते खूप उत्सुक आहेत. या अष्टपैलू खेळाडूचा नवा अवतार पाहून चाहते खूप उत्साहित झाले आहेत. ते कमेंट करून पलाशला त्याच्या नवीन प्रोजेक्टसाठी शुभेच्छा देत आहेत.
View this post on Instagram
आंद्रे रसेलसाठी आयपीएलचा हा हंगाम चांगला गेला आहे. त्यानं आतापर्यंत 9 सामने खेळले, ज्यामध्ये त्याच्या नावावर 179 धावा आहेत. नाबाद 64 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. रसेल फलंदाजीशिवाय गोलंदाजीतही कमाल करतोय. त्यानं आतापर्यंत 9 सामन्यांत 9 बळी घेतले आहेत.
आयपीएलच्या या हंगामात आंद्रे रसेलची टीम कोलकाता नाईट रायडर्स देखील चांगली कामगिरी करत आहे. संघानं आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले असून ते गुणतालिकेत 12 अंकांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘किंग्ज’च्या लढतीत पंजाबची बाजी, घरच्या मैदानावर चेन्नईचा दारुण पराभव