---Advertisement---

डॅरेल मिशेलनं पूर्ण केल्या 2 धावा, मात्र धोनी क्रिजवरून हललाही नाही; चेन्नई विरुद्ध पंजाब सामन्यात मोठा ड्रामा

---Advertisement---

आयपीएल 2024 चा 49वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात जेव्हा महेंद्रसिंह धोनी क्रिजवर होता, तेव्हा खूप ड्रामा पाहायला मिळाला. यानंतर आता चाहते आणि माजी क्रिकेटपटू त्याच्यावर चांगलीच टीका करत आहेत.

पंजाबविरुद्ध महेंद्रसिंह धोनी फलंदाजी करत होता आणि डॅरेल मिशेल दुसऱ्या टोकावर उभा होता. धोनीनं शॉट मारला आणि चेंडूला दूर गेलेलं पाहून मिशेल धाव घेण्यासाठी पळाला. मात्र धोनी आपल्या जागेवरून हललाही नाही. त्यानं मिशेलला परत फिरण्याचा इशारा केला. तोपर्यंत मिशेलनं चक्क दोन धावा पूर्ण केल्या होत्या!

हा ड्रामा चेन्नईच्या डावाच्या अखेरच्या षटकामध्ये पाहायला मिळाला. धोनी डावाच्या 18व्या षटकात फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. त्यानंतर 19व्या षटकात डॅरेल मिशेल फलंदाजीला आला. डावाचं अखेरचं षटक फेकत होता अर्शदीप सिंग. अर्शदीपनं धोनीला ओव्हरचा तिसरा चेंडू टाकला, जो त्यानं डीप कव्हर्सच्या दिशेनं टोलावला. चेंडूला दूर जाताना पाहून नॉन स्टाइकर डॅरेल मिशेल धाव घेण्यासाठी पळाला, मात्र धोनीनं त्याला विरोध केला. मिशेल बॅटिंग क्रिजच्या जवळ येऊन पोहचला होता, मात्र धोनीनं त्याला वापस पाठवलं आणि मिशेल पुन्हा नॉन स्ट्राइक क्रिजकडे पळाला. अशाप्रकारे मिशेलनं 2 धावा पूर्ण केल्या, मात्र धोनी आपल्या जागेवरून हललाही नाही.

 

हे पाहून समालोचन करणाऱ्या इरफान पठाणनं धोनीबद्दल नाराजी व्यक्त केली. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर दोन धावा चोरण्याच्या प्रयत्नात धोनी धावबाद झाला. अशाप्रकारे तो आयपीएलच्या चालू हंगामात प्रथमच बाद झाला आहे. महेंद्रसिंह धोनीनं 11 चेंडूत 14 धावा केल्या.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, चेन्नई सुपर किंग्जनं घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 162 धावा केल्या. कर्णधार ऋतुराज गायकवाडनं 48 चेंडूत सर्वाधिक 62 धावांची खेळी खेळली. धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्जनं 17.5 षटकांतच लक्ष्य गाठलं आणि 7 गडी राखून मोठा विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या –

अखेर ‘थाला’ची विकेट गेली! आयपीएल 2024 मध्ये प्रथमच झाला बाद; पंजाब किंग्जविरुद्ध रनआऊट होऊन परतला तंबूत

‘मिस्टर आयपीएल’नं 14 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी रचला होता इतिहास! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणार पहिलाच भारतीय

36 वर्षाच्या खेळाडूनं आयपीएलमध्ये पदार्पण करून रचला इतिहास! चेन्नईच्या प्लेइंग 11 मध्ये मिळाली जागा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---