जगभरात अनेक नव्या टी20 क्रिकेट लीगचे आयोजन केले जात. त्यात आता अमेरिकेचाही समावेश झाला आहे. अमेरिकेत मेजर क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेत इंडियन प्रीमिअर लीग फ्रँचायझीचे अनेक खेळाडू भाग घेणार आहेत. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या स्टार खेळाडूंचाही समावेश आहे. त्यात आंद्रे रसेल, सुनील नारायण, लॉकी फर्ग्यूसन आणि जेसन रॉय हे खेळाडू अमेरिकेत आपला जलवा दाखवताना दिसणार आहेत. मेजर क्रिकेट लीगच्या उद्घाटनाच्या हंगामासाठी हे चारही खेळाडू लॉस एंजेलिस नाईट रायडर्स संघाशी जोडले जातील.
लॉस एंजेलिस नाईट रायडर्स (Los Angeles Knight Riders) संघाने ऍडम झम्पा, मार्टिन गप्टील आणि रायली रुसो यांच्याशीही करार केला आहे. या संघात भारतीय खेळाडू उन्मुक्त चंद, अमेरिकेचा जसकरण मल्होत्रा आणि अली खान यांचाही समावेश आहे. जसकरण त्या निवडक खेळाडूंमध्ये सामील आहे, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात 6 षटकार मारण्याची कामगिरी केली आहे. उन्मुक्त चंद, जसकरण आणि अली खान यांना फ्रँचायझीने मार्चमध्येच ड्राफ्टमार्फत आपल्या ताफ्यात सामील केले होते.
मागील महिन्यात जेसन रॉय (Jason Roy) अमेरिकेच्या मेजर लीग क्रिकेट (Major League Cricket) स्पर्धेत भाग घेण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी असलेला करारही संपवण्यासाठी तयार झाला होता. त्याने आयपीएल 2023 हंगामात केकेआर संघासाठी बदली खेळाडूच्या रूपात खेळला होता.
तसेच, वेस्ट इंडिजचा अष्टपैलू आंद्रे रसेल (Andre Russell) आणि सुनील नारायण (Sunil Narine) हे खेळाडू केकेआरशी जोडले गेले आहेत. केकेआर आणि एलएकेआर संघांव्यतिरिक्त हे दोन्ही खेळाडू त्रिनबागो नाईट रायडर्स आणि आयएलटी20 स्पर्धेत अबूधाबी नाईट रायडर्स या संघांचेही प्रतिनिधित्व करतात.
खरं तर, लॉस एंजेलिस नाईट रायडर्स संघात अली शेख (अमेरिका), भास्कर यादरम (वेस्ट इंडिज), कॉर्ने ड्राय (दक्षिण आफ्रिका), नितीश कुमार (कॅनडा), सैफ बदर (पाकिस्तान) आणि शाडले वान शाल्विक (दक्षिण आफ्रिका) यांचाही समावेश आहे.
मेजर लीग क्रिकेट 2023 स्पर्धेत सहा संघांचा सहभाग असणार आहे. या स्पर्धेला 13 जुलैपासून सुरुवात होईल. तसेच, 30 जुलै रोजी अंतिम सामना पार पडेल. (andre russell to locky ferguson join knight riders los angeles mlc 2023 know list)
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2024मध्ये कोण होणार दिल्ली कॅपिटल्सचा कोच? संघमालकानेच केले स्पष्ट
अर्रर्र! वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी किशनचा मोठा निर्णय, ‘या’ स्पर्धेतून घेतली माघार; युवा खेळाडूची वर्णी