स्पेनचा मिडफिल्डर आंद्रेस इनिएस्ताने रविवार, 1 जुलैला आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली.
34 वर्षीय आंद्रेस इनिएस्ताने 2006 साली स्पेनच्या राष्ट्रीय संघातून आंतरराष्ट्रीय फु़टबॉलमध्ये पदार्पण केले होते.
यामध्ये 2006 ते 2018 या काळात आंद्रेस इनिएस्ताने स्पेनसाठी 131 सामन्यात 31 गोल केले आहेत.
आंद्रेस इनिएस्ताने स्पेनचे 2006, 2010, 2014 आणि 2018 च्या विश्वचषकात प्रतिनिधीत्व केले आहे.
2010 च्या फिफा विश्वचषकात स्पेनने विजेतेपद मिळवले होते. या विश्वचषकाच्या नेदरलॅंड विरुद्धच्या अंतिम सामन्यात आंद्रेस इनिएस्ताने स्पेनसाठी विजयी गोल केला होता. या गोलसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देण्यात आला होता.
2018 च्या फिफा विश्वचषकातील बाद फेरीच्या रविवारच्या सामन्यात स्पेनचा यजमान रशियाकडून पेनाल्टी शूटआउटमध्ये 4-3 अशा फरकाने पराभव झाला.
या पराभवामुळे स्पेनचे या विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे.
“हे खरे आहे आजचा सामना स्पेनसाठी माझा शेवटचा सामना होता. याचबरोबर माझ्या आयुष्यातील उत्कृष्ठ प्रकरण संपुष्टात आले. प्रत्येक गोष्टीची जशी सुरवात असते तसाच अंतदेखील असतो. मात्र माझ्या कारकिर्दिचा निरोप समारंभ आजच्या आमच्या पराभवामुळे मला अपेक्षित होता तसा झाला नाही.” असे स्पॅनिश फुटबॉलपटू आंद्रेस इनिएस्ता निवृत्तीबाबत बोलताना म्हणाला.
आंद्रेस इनिएस्ता बार्सिलोना फु़टबॉल क्लबसाठी 2002 ते 2018 असे अठरा वर्षे खेळला आहे.
बार्सिलोनाकडून खेळताना इनिएस्ताने 442 सामन्यात 35 गोल केले आहे.
आंद्रेस इनिएस्ताने नुकतेच बार्सिलोना क्लब सोडून जपानच्या विस्सेल कोब या फु़टबॉल क्लबशी दोन वर्षाचा करार केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-








