एकीकडे रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. तर दुसरीकडे हार्दिक पंड्या याच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघाची दुसरी तुकडी आयर्लंड दौऱ्यावर गेली आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध आयर्लंड संघात २ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे, ज्याची सुरुवात रविवारपासून (२६ जून) होणार आहे. डब्लिन येथे हा सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी आयर्लंड संघाचा कर्णधार ऍंड्र्यू बालबिर्नी हा विवाहबंधनात अडकला आहे.
बालबिर्नीने (Andrew Balbirnie) आठवडाभर आधीच म्हणजे १९ जून रोजी त्याची प्रेयसी केट मॅक हिच्यासोबत लग्न (Andrew Balbirnie Get Married) केले आहे. आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर त्याचे लग्न सोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत. दीर्घ काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांना आयुष्यभरासाठी एकमेकांचे होण्याचा निर्णय घेतला आहे. बालबिर्नीची पत्नी केट मॅक हीदेखील क्रिडापटू आहे. ती हॉकी खेळते.
A special day ♥️ pic.twitter.com/IpLRVJ4K4E
— Andy Balbirnie (@balbo90) June 19, 2022
Amazing day at an incredible venue ❤️ https://t.co/CaaA5VfvUV
— Andy Balbirnie (@balbo90) June 24, 2022
दरम्यान आयर्लंडचा कर्णधार बालबिर्नी याच्यापुढे भारतीय संघाचा अपराजित राहण्याचा विक्रम मोडण्याचे आव्हान असेल. आयर्लंड विरुद्ध भारत संघात आतापर्यंत ३ टी२० सामने झाले आहेत, ज्यातील तिन्हीही सामने भारतीय संघानेच जिंकले आहेत. सर्वप्रथम २००९ मध्ये आयसीसी वर्ल्ड ट्वेंटी ट्वेंटी स्पर्धेदरम्यान भारत आणि आयर्लंड संघ भिडले होते. या सामन्यात एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील संघाने ८ विकेट्सने विजय मिळवला होता.
तर २०१८ मध्ये भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्त्वात २०१८ मध्ये आयर्लंडचा दौरा केला होता. या दौऱ्यात उभय संघांनी २ टी२० सामने खेळले होते. ही मालिका भारतीय संघाने २-० च्या फरकाने जिंकली होती. यातील पहिला टी२० सामना ७६ धावांनी तर दुसरा टी२० सामना १४३ धावांनी जिंकण्यात भारतीय संघाला यश आले होते.
आयर्लंड दौऱ्यासाठीचा भारतीय संघ खालीलप्रमाणे:
हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहूल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आर. बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
असे आहे भारत वि. आयर्लंड टी२० मालिकेचे वेळापत्रक-
पहिला टी२० सामना- २६ जून, डब्लीन
दुसरा टी२० सामना- २८ जून डब्लीन
महत्त्वाच्या बातम्या-
अजब गजब! चेतेश्वर पुजाराने दोन्ही टीमकडून केली बॅटींग, व्हिडिओ व्हायरल
‘मी इथे कोणाला काही दाखवायला आलो नाही’, कर्णधार हार्दिक पंड्याचे टिकाकारांना कडवे प्रत्युत्तर