ऑस्ट्रेलियाने यावर्षी विश्वचषक जिंकला. वनडे विश्वचषक 2023चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला होता. संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य राहणारा भारत ऐन अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला. दुसरीकडे स्पर्धेची सुरुवात सुमार करणाऱ्या ऑस्ट्रेलियासाठी स्पर्धेचा शेवट अप्रतिम झाला. पण ऑस्ट्रेलियन संघाला हे कशामुळे शक्य करता आले, याचे उत्तर अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी दिले.
वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) हंगामात ऑस्ट्रेलियन संघ पहिले दोन्ही सामने पराभूत झाला होता. भारताविरुद्ध 6 विकेट्सने, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 134 धावांनी ऑस्ट्रेलियाला पराभव स्वीकारावा लागला. या दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाची खेली सुमार दिसल्यामुळे अनेकांनी वेगवेगळे अंदाज बांधले. यावर्षी ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीआधीच बाहेर जाईल, असेही बोलले जात होते. पण स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट्सने विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने जोरदार पुनरागमन केले. त्यानंतर एकाही सामन्यात ऑस्ट्रेलियन पराभूत झाले नाहीत आणि विश्वचषक उंचावला.
पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभव मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने त्यानंतर अशी काय रनणीतीमुळे संघाला विजय मिळला. या प्रश्नाचे उत्तर ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड (Andrew McDonald) यांनी दिले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मॅकडोनाल्ड म्हणाले, “सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू एकत्र आले. संघाने निर्णय घेतला की, आपण योग्य दिशेने पुढे जात आहोत आणि यावरच कायम राहावे लागेल. हे मिळवायचे आहे, ते मिळवणारच. भले पहिल्या दोन सामन्यांचा निकाल आमच्या मनाप्रमाणे लागला नव्हता. याआधीही आमच्यासोबत असे झाले होते. भारताविरुद्ध कसोटी मालिकेत आम्हाला 0-2 च्या अंतराने मागे होतो आणि त्यानंतर पुनरागमन केले होते. लोकांना वाटत होते आमच्यासाठी विश्वचषक संपला आहे. पण श्रीलंकेविरुद्ध पॅट कमिन्सने ज्या पद्धतीची गोलंदाजी केली, ते कौतुकास्पद होते. आम्ही त्यानंतर पुनरागमन करण्यात यशस्वी झालो.”
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलियन संघात विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने बाजी मारली आहे. मालिका जिंकण्यासाठी भारताला अजून फक्त एक, तर ऑस्ट्रेलिया तीन विजय हवे आहेत. असात ऑस्ट्रेलियन संघ पुनरागमन करणार की, मालिका गमावणार हे पाहण्यासारखे असेल. (Andrew MacDonald revealed what Australia’s plan was after their first two World Cup defeats)
महत्वाच्या बातम्या –
‘इथे मी एकटाच युनिवर्सल बॉस…’, सूर्यकुमार यादवविषयी असं का बोलला ख्रिस गेल
T20 World Cup 2024मध्ये भारतीय संघाचा कर्णधार पंड्या नकोच, झहीर खानने सुचवलं ‘हे’ नाव