---Advertisement---

आयपीएलच्या मानधनाने कालवलं जीवलग दिग्गजांच्या मैत्रीत विष; सायमंड्स म्हणाला होता, ‘तो माझ्यावर जळायचा’

On: मंगळवार, मार्च 15, 2022 6:58 AM
Michael-Clarke-And-Andrew-Symonds-Cricket
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू एँड्र्यू सायमंड्सने त्याचा जुना सहकारी मायकल क्लार्कसोबच्या बिघडलेल्या संबंधांविषयी काही दिवसांपूर्वी मोठा खुलासा केला होता. हे दोघे एके काळी चांगले मित्र होते, पण नंतर काही कारणास्तव त्यांच्यामध्ये अंतर निर्माण झाले. सायमंड्सने सांगितल्याप्रमाणे आयपीएलमध्ये त्याला क्लार्कपेक्षा अधिक रक्कम मिळल्यामुळे दोघांमधील संबंध बिघडले.

एँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds) आणि मायकल क्लार्क (Michael Clarke) यांनी ऑस्ट्रेलियन संघासाठी अनेक वर्ष एकत्र क्रिकेट खेळले. दोघांचे एकमांसोबत चांगली मैत्री होती. परंतु, सायमंड्सच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात क्लार्कसोबत त्याचे संबंध बिघडले. आयपीएल २००८ (IPL 2008) मध्ये सायमंड्स दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. डेक्कन चार्जर्सने त्याला आयपीएलच्या या पहिल्या हंगामात मोठी रक्कम खर्च करून विकत घेतले होते. सायमंड्सच्या मते याच कारणास्तव क्लार्क त्याच्यावर जळू लागला होता.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

‘मायकल क्लार्क माझ्यावर जळू लागला होता’
माध्यमांतील वृत्तानुसार, एँड्र्यू सायमंड्सने ब्रेट लीसोबत बोलताना क्लार्कसोबतच्या चांगल्या आणि वाईट संबंधांचा खुलासा केला. सायमंड्स म्हणाला की, “जेव्हा मायकल क्लार्क संघात आला, तेव्हा आम्ही खूप जवळ आलो होतो. मी त्याच्यासोबत खूप फलंदाजी केली होती आणि त्याची खूप काळजी देखील केलेली. आमचा खूप चांगला बाँड बनला होता.”

आयपीएल सुरू झाल्यानंतर दोघांमध्ये निर्माण झालेल्या अंतराविषयी बोलताना सायमंड्स म्हणाला की, “जेव्हा आयपीएलची सुरुवात झाली, तेव्हा खेळण्यासाठी मला त्याच्यापेक्षा खूप जास्त पैसे मिळाले होते. याच कारणास्तव त्याच्या मनात माझ्याविषयी थोडी ईर्षेची भावना निर्माण झाली होती आणि तेव्हापासूनच संबंधात अंतर निर्माण झाले. पैसा चांगली गोष्ट आहे, पण त्यामुळे नुकसान देखील होऊ शकते. माझ्या मते पैशामुळेच आम्हा दोघांमध्ये कटूता आली. आता माझी त्याच्यासोबत मैत्री नाहीये आणि मला याविषयी काहीच अडचण नाहीये.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---