क्रिकेटविश्वाला रविवारी (१५ मे) मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स याचे शनिवारी (१४ मे) झालेल्या कार अपघातात निधन झाले. त्याच्या निधनाबद्दल क्रिकेटविश्वातून हळहळ व्यक्त होत असून अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्याच्याबद्दल शोक व्यक्त केला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासात २०१० च्या दशकातील महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये सायमंड्सचे (Andrew Symonds) नाव घेतले जाते. त्याने अनेकदा त्याच्या अष्टपैलू कामगिरीने ऑस्ट्रेलियाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. तो २००३ सालच्या आणि २००७ सालच्या विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होता.
त्याने २००३ विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध १४३ धावांची खेळी केली होती. तसेच अंतिम सामन्यात भारताच्या दिनेश मोंगिया आणि हरभजन सिंग यांना बाद केले होते. त्याचा शनिवारी एलिस नदी पुलाजवळील हर्वे रेंज रोडवर अपघात झाला असल्याचे एलिस नदी पुलाजवळील हर्वे रेंज रोडवर झाला आहे. क्विन्सलँड पोलिसांनी सांगितले आहे. रस्त्यावरून त्याची कार घसरली आणि पलटी झाली. या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला आपल्या प्राणाला मुकावे लागले.
सायमंड्सची कारकिर्द
सायमंड्सने १९९८ साली ऑस्ट्रेलियाकडून वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर त्याचे २००४ मध्ये कसोटी आणि २००५ मध्ये आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण झाले. त्याने २६ कसोटी सामने खेळले असून १४६२ धावा केल्या, तसेच २४ विकेट्स घेतल्या. त्याने कसोटीत २ शतके आणि १० अर्धशतके केली.
तसेच त्याने १९८ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ५०८८ धावा केल्या असून १३३ विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत त्याच्या नावावर ६ शतके आणि ३० अर्धशतके आहेत. त्याचबरोबर त्याने १४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले, ज्यात त्याने २ अर्धशतकांसह ३३७ धावा केल्या आणि ८ विकेट्स घेतल्या.
त्याने त्याच्या कारकिर्दीत २२७ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले. त्यात त्याने १४४७७ धावा केल्या, तसेच २४२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ४२४ अ दर्जाचे सामने खेळले, ज्यात त्याने ११०९९ धावा केल्या आणि २८२ विकेट्स घेतल्या. तो ९३ टी२० सामने देखील खेळला, ज्यात त्याने २१४१ धावा केल्या आणि ५२ विकेट्स घेतल्या. तो आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्सकडूनही खेळला. त्याने आयपीएलमध्ये ३९ सामने खेळताना ९७४ धावा केल्या आणि २० विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
रसेलने दाखवली मसल पॉवर! विस्फोटक फलंदाज सेहवागला पछाडत आयपीएलचा मोठा विक्रम केला काबीज
केवळ सायमंड्स नाही, तर या ५ क्रिकेटपटूंचाही रस्ते अपघातात झाला मृत्यू, एक तर होता केवळ २४ वर्षांचा
मंकीगेट प्रकरणामुळे भारतीयांच्या डोक्यात गेला होता एँड्र्यू सायमंड्स, नक्की काय होतं ते प्रकरण?