Thursday, May 19, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केवळ सायमंड्स नाही, तर या ५ क्रिकेटपटूंचाही रस्ते अपघातात झाला मृत्यू, एक तर होता केवळ २४ वर्षांचा

केवळ सायमंड्स नाही, तर या ५ क्रिकेटपटूंचाही रस्ते अपघातात झाला मृत्यू, एक तर होता केवळ २४ वर्षांचा

May 15, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Andrew-Symonds

Photo Courtesy: Twitter/CricketAus


रविवारी (१५ मे) सकाळी क्रिकेटमधून एक धक्कादायक बातमी समोर आली. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स याचे शनिवारी (१४ मे) रात्री झालेल्या कार अपघातात निधन झाले. ४६ वर्षीय सायमंड्सने ऑस्ट्रेलियाला अनेकदा मोठे विजय मिळवून दिले होते. तो २००३ आणि २००७ विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग देखील होता. 

दरम्यान, अँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds) पहिला असा क्रिकेटपटू नाही, ज्याला कार अपघातात किंवा रस्ता अपघातात जीव गमवावा लागला आहे. यापूर्वी देखील काही क्रिकेटपटूंनी अशाच दुर्दैवी घटनांमुळे प्राण गमावला आहे. या लेखातही आपण आशा ५ क्रिकेटपटूंविषयी जाणून घेऊ, ज्यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला.

१. बेन हॉलिओक – इंग्लंडचा क्रिकेटपटू बेन हॉलिओक (Ben Hollioake) यालाही कार अपघातात आपले प्राण गमवावे लागले होते. केवळ १९ व्या वर्षी त्याने इंग्लंडकडून पदार्पण केले होते. पण, केवळ २४ व्या वर्षी त्याच्या कारचा अपघात झाला. पर्थमध्ये कार चालवत असताना, त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार भिंतीला धडकली होती. ही घटना २३ मार्च २००२ रोजी घडली होती. त्याने इंग्लंड संघासाठी २० वनडे आणि २ कसोटी सामने खेळले होते.

२. ध्रुव पंडोव – भारताचा क्रिकेटपटू ध्रुव पंडोव (Dhruva Pandove) याचाही कार अपघातात मृत्यू झाला होता. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नसला तरी त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळले होते. तो पंजाबकडून खेळला होता. १९९२ साली त्याचा वयाच्या १८ व्या वर्षी कार अपघात झाला होता. अंबाला जवळील रस्त्यावर त्याचा हा अपघात झाला होता.

३. कोली स्मिथ – वेस्ट इंडीजचे माजी अष्टपैलू कोली स्मिथ (Collie Smith) यांचे ९ सप्टेंबर १९५९ रोजी इंग्लंडमध्ये झालेल्या भीषण कार अपघातात निधन झाले होते. त्यावेळी त्यांच्यासह गॅरी सोबर्स देखील होते. सोबर्स कार चालवत होते. त्यावेळी स्ट्रॉफोर्डशायरमधील स्टोन ए ३४ च्या रस्त्यावरून कार वेगात जात असताना पहाटे ४.४५ वाजता १० टन वजनाच्या गुरांच्या ट्रक खुप वेगाने आला आणि तिची हेडलाईट सोबर्स त्यांच्या डोळ्यांवर चमकली, ज्यामुळे हा अपघात घडला. त्या अपघातात स्मिथ यांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. त्यांच्या निधनाचा सोबर्स यांच्यावर मोठा परिणाम झाला होता. स्मिथ यांनी २६ कसोटी सामन्यात ३१.७० च्या सरासरीने १.३३१ धावा आणि ४८ गडी बाद केले होते.

४. नजीब तरकाई – ६ ऑक्टोबर २०२० रोजी अफगाणिस्तानचा २९ वर्षीय खेळाडू नजीब तरकाई (Najeeb Tarakai) याचे निधन झाले होते. त्याचा २ ऑक्टोबर २०२० रोजी कार अपघात झाला होता. त्यानंतर तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर काहीदिवस उपचार करण्यात आले, पण तो वाचू शकला नाही. नजीब तरकाईने अफगाणिस्तानसाठी एक एकदिवसीय आणि १२ टी-२० सामने खेळले होते.

५. रुनाको मोर्टन – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू रुनाको मोर्टन याला (Runako Morton) देखील रस्ता अपघातात आपले प्राण गमवावे लागले होते. त्याची गाडी त्रिनिदादमधीस सोलमॉन हायवेवरील एका पोलवर धडकली होती. हा अपघात २०१२ साली झाला होता. त्यावेळी तो केवळ ३३ वर्षांचा होता. त्याने १५ कसोटी सामने, ५६ वनडे आणि ७ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले होते.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

मंकीगेट प्रकरणामुळे भारतीयांच्या डोक्यात गेला होता एँड्र्यू सायमंड्स, नक्की काय होतं ते प्रकरण?

अनिल कुंबळेने ‘मंकीगेट’ प्रकरणाबाबत १२ वर्षांनंतर केलेला मोठा खुलासा; म्हणालेला, ‘त्यावेळी खेळाच्या हिताचा…’

स्वत:च्याच देशाविरुद्ध शतक ठोकणारा सायमंड्स, वाचा त्याच्याबद्दल माहीत नसलेल्या १० गोष्टी


ADVERTISEMENT
Next Post
Andre-Russell

रसेलने दाखवली मसल पॉवर! विस्फोटक फलंदाज सेहवागला पछाडत आयपीएलचा मोठा विक्रम केला काबीज

Andrew-Symonds

सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू! कशी राहिली त्याची क्रिकेटमधील आकडेवारी, जाणून घ्या एका क्लिकवर

Mohammed-Siraj

एवढ्या धावा कोण देतं? यंदाच्या हंगामात फलंदाजांपुढं गुडघे टेकणारे ५ गोलंदाज; सिराज अव्वलस्थानी

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.