ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध बिग बॅश लीगचा हंगाम अंतिम चरणात आला आहे. साखळी फेरी सामन्यांचा टप्पा पार केल्यानंतर प्लेऑफमध्ये पात्र ठरलेले संघ अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी झगडत आहेत. अशात शनिवारी (३० जानेवारी) सिडनी सिक्सर्स विरुद्ध पर्थ स्कॉचर्स संघात प्लेऑफ सामना पार पडला. १८ चेंडू राखून ९ विकेट्सने हा सामना जिंकत सिडनी सिक्सर्सने अंतिम सामन्यात धडक मारली. या सामन्यादरम्यान अतिशय मजेशीर घटना घडली.
पर्थ स्कॉचर्सच्या एका गोलंदाजाने सिडनी सिक्सर्सच्या फलंदाजाचे शतक अडवण्यासाठी वाइड चेंडू टाकला. त्यानंतर स्वत: त्या फलंदाजाकडे जाऊन आपल्या कृत्यासाठी क्षमा मागितली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शतक अडवण्यासाठी मुद्दाम टाकला वाइड बॉल
झाले असे की, प्रथम फलंदाजी करताना पर्थ स्कॉचर्सने निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत १६७ धावा केल्या. प्रत्युत्तरात सिडनी सिक्सर्सचे सलामीवीर जोश फिलिप आणि जेम्स विंस संघाचा डाव पुढे नेत होते. सामना अंतिम टप्प्यावर आला असताना डावातील १८ वे षटक टाकण्यासाठी अँड्र्यू टाय आला. यावेळी सिडनी सिक्सर्सला विजयासाठी फक्त १ धाव घेण्याची गरज होती. सोबतच जेम्स विंसला त्याचे शतक पूर्ण करण्यासाठी अवघ्या २ धावांची आवश्यकता होती.
अशा रोमांचक घडीला गोलंदाज अँड्र्यू टायने मुद्दाम षटकातील पहिला चेंडू खेळपट्टीच्या बाहेरील बाजूने टाकला. पंचांनी तो चेंडू वाइड असल्याचे घोषित केले. अँड्र्यू टायने मुद्दाम अशाप्रकारचा चेंडू टाकल्याने जेम्स विंसचा पारा चढला आणि काही वेळ नजर रोखून रागाने त्याने जेम्स विंसकडे पाहिले. त्यानंतर आपल्या संघाने सामना जिंकला असल्यामुळे जेम्स विंस मैदानाबाहेर जाण्यासाठी निघाला. हे पाहून, गोलंदाज अँड्र्यू टाय पटकन त्याच्याजवळ गेला आणि हात मिळवत त्याच्याशी क्षमा मागितली.
James Vince on 98* with one run needed… and then this happens! 🙈@BKTtires | #BBL10 pic.twitter.com/PBsFwrBCCA
— cricket.com.au (@cricketcomau) January 30, 2021
जेम्स विंसची धुव्वादार फलंदाजी
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पर्थ स्कॉचर्सचा यष्टीरक्षक फलंदाज जोश इंग्लिश याने सर्वाधिक ६९ धावांची खेळी केली होती. यात कर्णधार एश्टन टर्नर याने ३३ धावा आणि कोलिन मुन्रो याने ३० धावांची भर पाडली होती. यासह पर्थ स्कॉचर्सने सिडनी सिक्सर्सला १६८ धावाचे लक्ष्य दिले होते.
या लक्ष्याचा पाठलाग करताना सिडनी सिक्सर्सचे सलामीवीर जोश फिलिप आणि जेम्स विंस यांनी किल्ला लढवला. फिलिप ४५ धावांची खेळी करत बाद झाला. त्यानंतर जेम्स विंसने डॅनियल हॉजेससोबत मिळून डावास चालना दिली. डावाखेर नाबाद राहत त्याने ५३ चेंडूत ९८ धावांची आतिशी खेळी केली. यात १ षटकार आणि १४ चौकारांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडचा ‘हा’ गोलंदाज देणार भारतीय फलंदाजांना काट्याची टक्कर, २७ सामन्यात घेतल्यात ११० विकेट्स
‘हरियाणा हरिकेन’ कपिल देव यांनी आजच्याच दिवशी केला होता कसोटीतील ‘मोठा’ विश्वविक्रम
खराब फॉर्ममध्ये असलेल्या पृथ्वीला ‘हा’ मुंबईकर देणार फलंदाजीचे धडे