सोमवारी (दि. 1 मे) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 43वा सामना कोणताही क्रिकेटप्रेमी विसरणार नाही. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने-सामने होते. या सामन्यात बेंगलोर संघाने 18 धावांनी विजय मिळवला. मात्र, सामन्यानंतर दोन्ही संघांच्या नावाजलेल्या खेळाडूंमध्ये भांडण झाली. त्यात विराट कोहली, नवीन-उल-हक आणि मार्गदर्शक गौतम गंभीर यांचा समावेश होता. या प्रकारानंतर क्रिकेटमधील आजी-माजी खेळाडूंनी भाष्य केले. त्यात भारताचा माजी दिग्गज खेळाडू अनिल कुंबळे याचाही समावेश होता. कुंबळेचे वक्तव्य सध्या सर्वत्र चर्चेत आहे.
काय म्हणाला अनिल कुंबळे?
या सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर (Virat Kohli And Gautam Gambhir) यांच्यात बाचाबाची झाली. या प्रकारावर आयपीएल विशेषज्ञ अनिल कुंबळे (Anil Kumble) हा खूपच नाराज झाला. तो म्हणाला की, “खूप भावना होत्या, पण तुम्ही या भावनांना इथे दाखवू शकत नाही. हे महत्त्वाचे आहे की, तुमच्यातील चर्चा व्हाव्यात, पण अशाप्रकारची बाचाबाची स्वीकार्य नाहीये.”
पुढे बोलताना कुंबले म्हणाला की, “जे काही झाले असेल, पण तुम्हाला तुमच्या विरोधी संघाचा आणि सामन्याचा आदर करावा लागेल. एकदा जेव्हा सामना संपतो, तेव्हा तुम्हाला हस्तांदोलन करायचे असते आणि आपली कटुता सोडायची असते. कारण, खेळाडू आणि विरोधी संघाचा आदर करणे गरजेचे आहे. मला माहिती नाही की, त्यांच्यात काय झाले, काही गोष्टी खासगी असू शकतात, पण तुम्ही ते क्रिकेटच्या मैदानावर आणले नाही पाहिजे. गौतम आणि विराट तसेच इतर जे खेळाडू यामध्ये सामील होते, हे पाहणे चांगले नाहीये.”
https://twitter.com/vishu_itsme/status/1653220306797105158
सामन्यादरम्यान लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) दुखापतग्रस्त झाला. यावर कुंबळे म्हणाला की, “जर केएल फिट असता, तर आपल्याला इथे वेगळे दृश्य पाहायला मिळाले असते. खासकरून अशाप्रकारच्या खेळपट्टीवर.”
सामन्याचा आढावा
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबी संघाने 20 षटकात 9 विकेट्स गमावत 126 धावा केल्या. यामध्ये कर्णधार फाफ डू प्लेसिस याच्या सर्वाधिक 44 धावांचा समावेश होता. त्याला विराट कोहली यानेही साथ देत 31 धावा केल्या. दोघांनी 62 धावांची सलामी भागीदारी रचली. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊ संघाच्या फलंदाजांना रोखण्यात आरसीबीच्या गोलंदाजांना यश आले. आरसीबीच्या गोलंदाजांनी लखनऊ संघाला 19.5 षटकात सर्वबाद करून 108 धावांवर गुंडाळले. यामध्ये फिरकीपटू कर्ण शर्मा आणि वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड यांनी सर्वाधिक प्रत्येकी 2 विकेट्स नावावर केल्या. (Anil kumble on kohli and gambhirs debate it was not good to see know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आधी भांडण नंतर रिऍक्शन! ड्रेसिंग रूममध्ये गेल्यावर विराटची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘जर तू बोलला, तर…’
विराटची शिकार करताच जल्लोष करत होता बिश्नोई, पण अंपायरने मारली चापट? व्हिडिओत लपलंय सत्य






