साल 2008च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताचा हरभजन सिंग आणि ऑस्ट्रेलियाचा अँड्र्यू सायमंड्स यांच्यात वाद झाला. वर्णभेदाची टीका केली म्हणून हरभजनवर तीन सामन्यांसाठी बंदी घातली गेली. मँकेगेट प्रकरण इतके वाढले होते की भारताने हरभजनवर लादलेल्या बंदीविरोधात अपील दाखल केले होते. दौरा सोडून भारतात परत जाण्याची मागणी होत होती. या प्रकरणात सचिन तेंडुलकरची साक्ष घेतली गेली. त्यानंतर हरभजनवरील बंदी उठविण्यात आली.
दरम्यान, भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने 2008च्या ऑस्ट्रेलिया दौर्याच्या वेळी मँकेगेट प्रकरणाचा 12 वर्षानंतर खुलासा करताना म्हटले होते की, या प्रकरणात ऑफस्पिनर हरभजन सिंगचादेखील दोष होता. ड्रेसिंग रूममध्ये बर्याच लोकांनाही असेच वाटत होते.
कुंबळेने आपल्या ऑफ-स्पिनर आर अश्विनला त्याच्या यू-ट्यूब चॅनल ‘डीआरएस विथ ऍश’ वर सांगितले की, ‘कर्णधार म्हणून तुम्ही सहसा मैदानावरील निर्णय घेण्यास तयार राहता. येथे मला मैदानाबाहेर असलेल्या काही गोष्टींचा सामना करावा लागला होता. त्यावेळी खेळाच्या हिताचा निर्णय घ्यावा लागला. आमच्या संघाचा खेळाडू हरभजन याला वर्णद्वेषीची टिप्पणी केल्याबद्दल तीन सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आम्ही या निर्णयाच्या विरोधात अपील केले.’
कुंबळे म्हणाला की, “आम्हाला संघ म्हणून स्पष्टपणे एकत्र रहावे लागले. पण त्यावेळी हा संघ दौरा सोडून परत जाईल असा अंदाज वर्तविला जात होता. तथापि, हे केल्यावर भारतीय संघाने काहीतरी चुकीचे केले असावे म्हणून ते परत आले असे लोकांना वाटेल म्हणून आम्ही दौरा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.”
माजी कर्णधार म्हणाला की, “मला वाटते एक कर्णधार म्हणून किंवा संघ म्हणून आम्ही दौर्यावर मालिका जिंकण्यासाठी जातो. दुर्दैवाने पहिल्या दोन कसोटी सामन्यांचे निकाल आमच्या बाजूने आला नाही. पण उर्वरित दोन सामने जिंकून आम्हाला मालिका बरोबरी साधण्याची संधी मिळाली. मी भाग्यवान होतो की या संघात वरिष्ठ खेळाडू आणि माजी कर्णधार होते. एक चांगला संदेश चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा दौरा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.”
महत्त्वाच्या बातम्या –
स्वत:च्याच देशाविरुद्ध शतक ठोकणारा सायमंड्स, वाचा त्याच्याबद्दल माहीत नसलेल्या १० गोष्टी
सायमंड्सच्या निधनाने हळहळला हरभजन सिंग; ट्वीट करत म्हणाला, ‘खूप लवकर गेला…’
टी२० विश्वचषकासाठी सायमंड्सला मिळणार होती मोठी जबाबदारी! मात्र,…