ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup) च्या स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडकडून 10 विकेट्सने दारूण पराभव स्विकारावा लागला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट्स गमावत 168 धावा केल्या. यामध्ये हार्दिक पंड्या याच्या 33 चेंडूत केलेल्या 63 धावांचा समावेश आहे. 10 षटके संपली जेव्हा भारताने 62 धावसंख्या उभारली होती. या सामन्यात विराट कोहली याच्या फलंदाजीवर भारताच्या माजी प्रशिक्षकाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी माध्यमांशी बोलताना विराट कोहली (Virat Kohli) याने इंग्लंडच्या स्पिनर्सविरुद्ध अधिक आक्रमक खेळण्याची आवश्यकता होती. त्याचबरोबर भारताला काही अशा फलंदाजांनी आवश्यकता आहे जे काही षटके गोलंदाजी करू शकतील, असेही त्यांनी सुचविले आहे.
सलामीवीर केएल राहुल पाच चेंडूत पाच धावा आणि रोहित शर्मा याने 28 चेंडूत 27 धावा केल्या. विराट कोहली याने 40 चेंडूत अर्धशतक केले, तर सूर्यकुमार यादव 14 धावा करत तंबूत परतला. या चार फलंदाजांनी 83 चेंडूत 10 चौकार आणि दोन षटकार मारले.
कुबंळे म्हणाले, “आदिल रशिद याला पूर्ण श्रेय जाते, कारण तो ज्या प्रकारे चेंडू स्पिन करत होता त्याला खेळणे सोपे नव्हते. आधीच इंग्लंडच्या संघात मार्क वूड याच्या अनुपस्थितीत कोणीतरी पुढे येईल अशी अपेक्षा संघाला होती. त्यातच लियाम लिविंगस्टोन अधिक षटके गोलंदाजी करेल अशी अपेक्षा नव्हती.”
“भारत ज्या स्थितीत होता त्यावरून विराट आक्रमक फलंदाजी करेल असे वाटत होते. क्रीझवर असताना सूर्या आणि हार्दिकने तसे केले. जेव्हा दोन स्पिनर्स गोलंदाजी करतात तेव्हा मला वाटले अधिक चौकार मारून लिविंगस्टोनवर दबाव निर्माण करेल”, असेही कुंबळे यांनी पुढे म्हटले. Anil Kumble raised questions on Virat Kohli batting in semifinal
भारताच्या पराभवाला संथ फलंदाजी हे एक कारण आहे. रोहितने 28 चेंडूत 27 धावा केल्या. पहिल्या 10 षटकात केवळ 62 धावाच झाल्या. उपांत्य फेरीच्या सामन्यात 4 म्हणजे पूर्ण 7 षटके निर्धाव गेली. हार्दिकने क्रिस जॉर्डन आणि सॅम करन यांना काही षटकार मारले नसते तर भारताची धावसंख्या 150 नसती. अर्धशतक करूनसुद्धा विराट काही मोठे शॉट्स खेळू शकला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘डिव्हिलियर्सला टीम इंडियाचा मेंटर बनवा’; भारतीय दिग्गजाने केली मागणी
बाबर आझम होणार पाकिस्तानचा पंतप्रधान! गावसकरांनी केले भाकीत