---Advertisement---

माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेंच्या विमानातील त्या कृ्तीने जिंकली चाहत्यांची मने

On: बुधवार, ऑक्टोबर 10, 2018 12:44 PM
---Advertisement---

मुंबई | भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेंनी त्यांच्या एका खास कृतीने हजारो चाहत्यांची मनं जिंकली आहेत. विमानात प्रवास करताना कुंबळेला भेटण्यासाठी लाजणाऱ्या एका चाहत्यासाठी कुंबळेने स्वत: पुढाकार घेत भेट घेतली.

९ आॅक्टोबर रोजी बेंगलोर मुंबई विमानात प्रवास करणाऱ्या सोहीनी मित्तर या महिला पत्रकाराने एक ट्विट केला. ” मी ज्या विमानाने बेंगलोरवरुन मुंबईला प्रवास करत आहे त्यात अनिल कुंबळे आहेत. त्यांचाकडे एकदा पाहिले आणि विंडीजविरुद्ध जबडा तुटलेला असतानाच्या कुंबळेच्या खेळाची आठवण झाली. डोळ्यात पाणी आले. ” असे ट्वीट त्या महिला पत्रकाराने केले.

“मी कुंबळेंनी जाऊन भेटणार होते. तसेच त्यांनी दिलेल्या आनंदाबद्दल, आठवणींबद्दल आभारही मानायचे होते. परंतु माझे पाय तिकडे ओढले गेले नाही.” असा तिने दुसरा ट्वीट केला.

यावर कुंबळेंनी केवळ २० मिनीटांत ट्वीट केला. तसेच ‘टेक आॅफ झाल्यावर मला निसंकोच भेटायला या’ असे ट्वीटमध्ये म्हटले.

https://twitter.com/Mittermaniac/status/1049600661602652160?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1049600661602652160&ref_url=https%3A%2F%2Fcircleofcricket.com%2Fcategory%2Fsocial_scoop%2F28028%2Fanil-kumbles-humble-gesture-for-a-fan-will-move-you

यावर भेट झाल्यावर तिने कुंबळेच्या सहीचा फोटो ट्वीट केला तसेच कुंबळेकडून नम्रता शिकण्यासारखी असल्याचे म्हटले.

https://twitter.com/Mittermaniac/status/1049648831527301120

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment