इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन सध्या संघासोबत पाकिस्तान दौऱ्यावर आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना रावलपिंडीमध्ये खेळला गेला, जो इंग्लंडने 74 धावांच्या अंतराने जिंकला देखील. यादरम्यान अँडरसनची गोलंदाजी जबरदस्त राहिली. त्याने सामन्यात एकूण 46 षटके गोलंदाजी केली आणि पाच विकेट्स घेत विश्वविक्रम केला.
जेम्स अँडरसन (James Anderson) पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात इतर कोणत्याही गोलंदाजाच्या तुलनेत सर्वात जास्त षटके टाकणारा गोलंदाज ठरला आहे. रावलपिंडी स्टेडियंच्या सपाट खेलपट्टीवर त्याने 46 षटकात 5 विकेट्स घेतल्या आणि भारतीय दिग्गज अनिल कुंबळे (Anil Kumble) यांचा विक्रम देखील मोडीत काढला. वयाच्या 40 व्या वर्षी अँडरनच्या या प्रदर्शनामुळे त्याचे कौतुक केले जात आहे.
अँडरसनने या सामन्यात टाकलेल्या 46 षटकांपैकी 16 षटके निर्धाव होती. यादरम्यान त्याने 88 धावा खर्च करून पाकिस्तानच्या पाच विकेट्स घेतल्या. सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 22 षटके गोलंदाजी केली आणि 52 धावा देत एक विकेट घेतली. यापैकी 4 षटके निर्धाव होती. सामन्याच्या दुसऱ्या डावात अँडरसनने 24 षटके टाकली आणि यामध्ये 36 धावा खर्च करून 4 विकेट्स घेतल्या. यादरम्यान तब्बल 12 षटके त्याने निर्धाव टाकली. या प्रदर्शनानंतर अँडरसन आँतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
यापूर्वी दिग्गज अनिल कुंबळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसरे सर्वात जास्त विकेट्स घेणारे गोलंदाज होते, जे आता चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत. कुंबळेंनी 403 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 956 विकेट्स घेतल्या आहेत. तर दुसरीकडे अँडरसनने 389 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 959 विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्न 1001 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर पहिल्या क्रमांकापल श्रीलंकन दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन आहे. मुरलीधरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 1347 विकेट्स घेतल्या आहेत. एंकदरीत पाहता अँडरनस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज आहे. तत्पूर्वी अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये देखील तिसरा सर्वात जास्त विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. (Anil Kumble’s record was broken by James Anderson in Rawalpindi)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चित्तथरारक! कैफने 10 हजार फुटांच्या उंचीवरून मारली डाईव्ह, पाहून तुमचेही फिरतील डोळे
आर अश्विनची भविष्यवाणी! आयपीएल 2023 च्या लिलावात ‘या’ खेळाडूवर लागणार सर्वात मोठी बोली