---Advertisement---

शेफाली भारतीय क्रिकेटची ‘फ्युचर स्टार’, भारतीय दिग्गज क्रिकेटपटूने थोपटली पाठ

On: बुधवार, जून 9, 2021 7:29 PM
---Advertisement---

सध्या भारतीय पुरुष क्रिकेट संघ तसेच महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना १८ ते २२ जून या कालावधीत खेळला जाईल. त्याच बरोबर महिला संघ इंग्लंडच्या महिला संघाविरुद्ध तीनही प्रकारच्या मालिका खेळेल. भारतीय महिला संघाला दौऱ्यावर एकमेव कसोटी सामना खेळायचा आहे. त्याविषयी माजी दिग्गज भारतीय महिला क्रिकेटपटू अंजुम चोप्रा यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

कसोटी जर्सी घालणे उत्साहवर्धक
भारतीय महिला संघ तब्बल ७ वर्षानंतर कसोटी सामना खेळणार आहे. १६ जूनपासून हा सामना ब्रिस्टल येथे खेळला जाईल. भारताचे १२ कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व करणाऱ्या अंजुम चोप्रा यांनी या कसोटी सामन्याविषयी बोलताना म्हटले, “भारतासाठी कसोटी खेळणे नेहमीच उत्साहवर्धक असते. ही जर्सी घातल्यास काहीशी भीती देखील वाटते. हा अनुभवच एकदम निराळा असतो. अनेक खेळाडू कसोटी खेळण्यापूर्वी घाबरलेले असतात. कारण, आपण दीर्घकाळ गोलंदाजी किंवा फलंदाजी करू शकू की नाही, याबाबत ते साशंक असतात. मात्र, नवे खेळाडू अधिक उत्साहीत असतात.”

भारतीय संघ या सामन्यात अनुभवी मिताली राज हिच्या नेतृत्वात उतरेल. भारतीय महिला संघाने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय कसोटी २०१४ मध्ये खेळलेला.

शेफाली भारताची भविष्यातील स्टार
अंजुम चोप्रा यांनी भारतीय संघातील युवा खेळाडू शेफाली वर्मा हिचे देखील कौतुक केले. त्यांनी म्हटले की, “शेफाली संघाची भविष्यातील मोठी खेळाडू असेल. तिने ऑस्ट्रेलियात दमदार कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध देखील तिची कामगिरी उल्लेखनीय होती. द हंड्रेड लीगमध्ये तिचा खेळ पाहायला आवडेल.”

अंजुम चोप्रा या सध्या समालोचक म्हणून काम पाहतात.

एकमेव कसोटीसाठी भारतीय महिला संघ:
मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), तानिया भाटिया (यष्टीरक्षक), झुलन गोस्वामी, एकता बिश्त, स्मृती मंधना, शेफाली वर्मा, शिखा पांडे, पूनम यादव, प्रिया पुनिया, स्नेह राणा, पूनम राऊत, अरूंधती रेड्डी, जेमिमा रॉड्रिग्ज, इंद्राणी रॉय (यष्टीरक्षक), दिप्ती शर्मा, राधा यादव व पुजा वस्त्रकार.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘वर्तमान काळातील महान फलंदाज’, माजी इंग्लिंश दिग्गजाने उधळली विराट आणि विलियम्सनवर स्तुतीसुमने

भारतीय खेळाडूंना द्विशक, शतक आणि ५ गडी बाद केल्यानंतर दिला जातो ‘एवढ्या’ रुपयांचा बोनस, माजी क्रिकेटपटूचा खुलासा

फ्रेंच ओपन: झ्वेरेव आणि त्सित्सिपासचा अंतिम ४ जणांमध्ये प्रवेश; उपांत्य सामन्यात येणार आमने-सामने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---