---Advertisement---

सुप्रसिद्ध युट्यूबरला मागावी लागली पृथ्वी शॉची माफी! केलेली आक्षेपार्ह पोस्ट

Prithvi Shaw Ankur Warikoo
---Advertisement---

भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पृथ्वी शॉ याने रॉयल लंडन कपमध्ये द्विशतक ठोकल्यामुळे त्याचे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे त्याची बिघडलेली फिटनेस पाहून त्याच्या टीका करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. सुप्रसिद्ध युट्यूबर अंकूर वारिकू यानेही शॉबाबत कमेंट केली होती. पण ही कमेंट त्याला चांगलीच माहागात पडल्याचे दिसते.

अंकुर वारिकू (Ankur Warikoo ) याला युट्यूबवर 30 लाखांपेक्षा अधिक सबस्क्राईबर्स आहेत. त्याने बोवलेल्या व्हिडिओंना नियमितपणे पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, एवढे चाहते असणाऱ्या या युट्यूबरला आपल्या एका चुकीमुळे अधिकृत ट्वीटर खात्यावरून पृथ्वी शॉ याची माफी मागावी लागली. अंकुर नागपाल या उद्योजकाने आपल्या ट्वीटर खात्यावरून पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्यावर टीका केली होती.

रॉयल लंडन कपमध्ये द्विशतक केल्यानंतर शॉच्या फिटनेसबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. नागपाल यानेही युवा फलंदाजाची फिटनेस पाहून त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. अशात अंकूर वारिकू याने या पोस्टवर कमेंट केली की, त्याचा (पृथ्वी शॉ) आईला मुलचे पातळ झाल्यासारखे वाटत आहे. वारिकूच्या या एका कमेंटमुळे त्याच्यावर जोरदार टीका झाल्याचे दिसते. नेटकऱ्यांच्या मते वारिकूने हद्द पार केली आहे. कारण शॉ 4 वर्षांचा असतानाच त्याच्या आईने जगाचा निरोप घेतला होता. वारिकूला आपण केलेली चूक समजताच त्याने सविस्तर पोस्ट करत शॉची माफी मागितली.

अधिकृत ट्विटर खात्यावरून त्याने पोस्ट केली की, “लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर मला माझी चूक समजली. हा फोटो पृथ्वी शॉ याचा आहे, ज्याने वयाच्या चौथ्या वर्षी आई गमावली होती. त्यामुळे मी केलेली पोस्ट अत्यंत असंवेदनशील बनते आणि मला याचा जराही अभिमान नाहीये. मी 20 वर्षांचा असताना माझ्या आईची जी नैसर्गिक प्रतिक्रिया असायची, ती पुन्हा घडवून आणण्याच्या प्रयत्नात माझ्याकडून ही चूक झाली.”

https://twitter.com/warikoo/status/1689531466693431296?s=20

दरम्यान, पृथ्वी शॉ रॉयल लंडन कपकमध्ये नॉर्थएम्पटनशायर संघासाठी खेळत आहे. त्याच्या बॅटमधून बुधवारी (9 ऑगस्ट) समरसेट संघाविरुद्ध खेळताना झंजाबाती द्विशतक निघाले. त्याने 153 चेंडूत 244 धावांची महत्वपूर्ण खेळी केली आणि आपल्या संघाला विजय देखील मिळवून दिली. असे असले तरी, या सामन्यात संघासाठी मॅच विनर ठरलेला शॉ जुलै 2022 नंतर भारतासाठी एकही सामना केळू शकला नाहीये. (Ankur Wariku apologizes to Prithvi Shaw for body shaming)

महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! टीम इंडियाला मिळाला नवा कोच; लक्ष्मणने आयर्लंड दौऱ्यास नकार दिल्याने दिग्गजाच्या खांद्यावर जबाबदारी
फॉर्ममध्ये परतताच पृथ्वी शॉचा संघ निवडकर्त्यांवर निशाणा; म्हणाला, ‘मी विचारही करत नाही…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---