बीसीसीआयने नुकतेच 2023 -24 वर्षासाठी आपल्या केंद्रीय करारातील खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीतून श्रेयस अय्यर आणि इशान किशनला वगळून बीसीसीआयने एकप्रकारे खेळाडूंना इशाराच दिला आहे. बीसीसीआयने यंदाच्या करारात अनेक युवा खेळाडूंनी संधी दिली आहे. तसेच काही खेळाडूंना बढती दिली असून काही खेळाडूंचे प्रमोशन झाले आहे. तसेच बीसीसीआयच्या नव्या केंद्रीय करारात मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल अन् कुलदीप यादवचं प्रमोशन झालं आहे. तर ऋषभ पंत, अक्षर पटेल यांच प्रमोशन झालं आहे.
याबरोबरच हा करार 2023-24 या वर्षासाठी जारी करण्यात आला असून त्यात अनेक तरुण चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर काही अनुभवी खेळाडूंना त्यात स्थान मिळालेले नाही. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर ही दोन मोठी नावे होती, ज्यांना बीसीसीआयने करारातून बाहेर काढले आहे. याशिवाय चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोन अनुभवी खेळाडूंना या करारातून वगळण्यात आले आहे. शिखर धवनचाही या करारात समावेश करण्यात आलेला नाही. यानंतर आता त्यांची कारकीर्द ठप्प झाली आहे का, असे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत.
तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलनंतर पुजाराने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीमध्येही त्याने चमकदार कामगिरी केली होती, मात्र आता त्याला संघातून वगळल्यानंतर त्याला बीसीसीआयने केंद्रीय करारातूनही वगळले आहे. आता यानंतर त्याची कारकीर्द थांबली आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबरोबरच, भारताला कसोटी क्रिकेटमध्ये अनेक संस्मरणीय विजय मिळवून देणारा माजी उपकर्णधार आणि दमदार फलंदाज अजिंक्य रहाणे देखील या कराराचा भाग नाही. गेल्या वर्षी आयपीएलनंतर रहाणे संघात परतला. तो WTC 2023 चा अंतिम सामनाही खेळला आणि त्यानंतर उपकर्णधार म्हणून वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला. मात्र यानंतर तो अचानक संघाबाहेर झाला आहे.
यानंतर भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवही टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून संघर्ष करत आहे. पुजारा आणि रहाणेप्रमाणे तोही आधीच्या कराराचा भाग होता. मात्र आता त्यालाही नव्या करारात स्थान मिळालेले नाही. तसेच बीसीसीआयने डिसेंबर 2022 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळलेल्या शिखर धवनचाही ताज्या करारात समावेश केलेला नाही.
NEWS 🚨- BCCI announces annual player retainership 2023-24 – Team India (Senior Men) #TeamIndia pic.twitter.com/oLpFNLWMJp
— BCCI (@BCCI) February 28, 2024
दरम्यान, भारतीय संघाचा आणखी एक वेगवान गोलंदाज इशांत शर्मा देखील या केंद्रीय कराराचा भाग नाही. गेल्या दोन वर्षांपासून तो सहभागी झालेला नाही. आता त्याच्या करिअरला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. तोही टीम इंडियात पुनरागमन करू शकेल की नाही हे अद्याप सांगणे कठीण आहे.
महत्वाच्या बातम्या –
- WPL 2024 : सोलापूरच्या किरण नवगिरेसमोर मुंबई इंडियन्सची बत्ती गूल, यूपी वॉरियर्सला मिळाला हंगामातील पहिला विजय
- भारतीय क्रीडा विज्ञान परिषदेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री श्री अनुराग सिंह ठाकूर यांनी देशातील राष्ट्रीय केंद्रांमध्ये क्रीडा विज्ञानाच्या महत्त्वावर भर दिला