ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर आपल्या फलंदाजीदरम्यान खूप आक्रमक दिसून येतो. परंतु वॉर्नर मैदानाबाहेर आपली मजेदार शैली दाखवण्यास विसरत नाही. वॉर्नर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. डेव्हिड वॉर्नरचे त्याच्या कुटुंबीयांसोबत अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
नुकताच असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात वॉर्नर कुटुंबाने पंजाबी डान्सचा तडका लावला. डेव्हिड वॉर्नरने जुना टिक टॉक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये डेव्हिड वॉर्नर आपली पत्नी कँडिस वॉर्नर आणि मुलींबरोबर पंजाबी डान्स करत आहे. यासाठी त्यांनी गायक सुखबीरचे प्रसिद्ध गाणे ‘सौदा खरा खरा’ निवडले आहे. या गाण्यावर त्याने कुटुंबासमवेत डान्स केला आहे. डेव्हिड वॉर्नरने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘लॉकडाउन थ्रोबॅक, तुम्हाला ते आवडले की नाही?’
https://www.instagram.com/p/CQDdWS4llZs/
टिक टॉक ऍपवर भारताने घातली बंदी
भारत सरकारने 2020 मध्ये अनेक चिनी ऍपवर बंदी घातली आहे. त्याच टीक टॉक अॅपचाही समावेश आहे, म्हणून वॉर्नरने ते इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केले आहे, जेणेकरुन भारतीय चाहते त्याचा आनंद घेऊ शकतील. अनेक व्हिडिओमधून डेव्हिड वॉर्नरने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे.
डेव्हिड वॉर्नरला तीन मुली आहेत
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला 3 कन्या आहेत. डेव्हिड वॉर्नरच्या मुलींची नावे इवी मे, इंडी रे आणि आयला रोज असे आहेत. या तिघींबरोबरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्याची मधली मुलगी इंडी ही विराट कोहलीची मोठी चाहती आहे. तिच्यासाठी विराटने स्वाक्षरी केलेली त्याची जर्सी भेट दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या विजेत्याला मिळणार तब्बल ‘इतकी’ रक्कम, आयसीसीने केली घोषणा
फक्त ‘एमएस धोनी’ चित्रपटच नाही, सुशांतने केले क्रिकेटवर आधारीत आणखी एका चित्रपटात काम