सध्या क्रिकेटजगतात वनडे, टी-२० आणि कसोटी या क्रिकेटच्या प्रकारांवरून वाद सुरू असतानाच दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज एन्रीच नॉर्कियाने महत्वाचे विधान केलं आहे. नॉर्कियाने त्यांच्या देशात कतसोटी क्रिकेटचे सामने खेळवण्याबाबत हे विधान केलं आहे.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्कियाने आपल्या संघाने कमी कसोटी सामने खेळल्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सारखे मोठे संघ जास्त कसोटी सामने खेळतात, तर दक्षिण आफ्रिकेत फार कमी सामने होतात, जे योग्य नाही. नॉर्कियाच्या मते, दक्षिण आफ्रिकेलाही अधिकाधिक कसोटी सामने खेळण्याची संधी मिळायला हवी, कारण संघ कमी कसोटी सामने खेळला तर क्रमवारीत कसा वर येईल? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा