दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिमय, दुबई येथे मंगळवारी (१० नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएल २०२०चा अंतिम सामना झाला. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १५६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने दमदार फटकेबाजी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. परंतु चांगल्या लयीत असताना दिल्लीच्या खेळाडूंनी मिळून त्याला झेलबाद केले.
झाले असे की, दिल्लीच्या १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित सलामीला फलंदाजीसाठी आला होता. त्याने पहिल्या षटकापासूनच जोरदार फटकेबाजी करायला सुरुवात केली. परिणामत: केवळ ५१ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकार लगावत त्याने ६८ धावा केल्या. परंतु, डावातील १७वे षटक टाकण्यासाठी आलेल्या दिल्लीच्या वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्किएपुढे रोहितला गुडघे टेकावे लागले.
Substitute fielder, Lalit Yadav taking the marvelous catch of the Hitman, Rohit Sharma who completed his half century in Nortje's ball was the 'Mazboot Pakad Moment' for @DelhiCapitals in today's match.#YehHaiNayiDilli#DelhiCapitals#KhelKhushiyonKa @jswsteel pic.twitter.com/Mz7t9c7wzC
— Rahul Tiwari (@rahulbt98) November 10, 2020
https://twitter.com/realsingh13/status/1326212523771613184
लवकर संघाचा डाव संपवण्याच्या हेतूने नॉर्किएच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रोहितने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. परंतु सीमारेषेच्या जवळ क्षेत्ररक्षणासाठी थांबलेला दिल्लीचा बदली खेळाडू ललित यादवने त्याचा शानदार झेल पकडला. अशाप्रकारे नॉर्किए आणि यादवने मिळून रोहितला पव्हेलियनला रवाना केले.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित…रोहित…मुंबई…मुंबई…फायनलमध्ये रोहितचा मुंबईकडून ‘हिट’ विक्रम
एकच फाईट वातावरण टाईट! आयपीएल फायनलमध्ये अर्धशतक झळकावणारा अय्यर ‘या’ यादीत थेट दुसऱ्या स्थानी
ट्रेंडिंग लेख-
IPL 2020 : मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक दांड्या गुल करणारा संघाचा हुकमी एक्का, घेतले सर्वाधिक बळी
मुंबई @5 : आयपीएल २०२० चे जेतेपद मिळवत मुंबई इंडियन्सने रचला इतिहास
IPL : काय सांगतो आयपीएलच्या जेतेपदाचा इतिहास? पाहा आतापर्यंतचे विजेते संघ