---Advertisement---

IPL 2020 : मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक दांड्या गुल करणारा संघाचा हुकमी एक्का, घेतले सर्वाधिक बळी

On: मंगळवार, नोव्हेंबर 10, 2020 10:17 PM
---Advertisement---

आयपीएल स्पर्धेत प्रत्येक संघाकडून खेळताना कोणता ना कोणता गोलंदाज हा अव्वल कामगिरी करताना दिसत असतो. मुंबई संघाकडून आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करणारे काही गोलंदाज आहेत. ज्यांनी एकेकाळी संपूर्ण हंगामात संघासाठी बळी मिळवून दिले होते.

लसिथ मलिंगा- 28 विकेट्स (2011)

यॉर्कर किंग लसिथ मलिंगा हा मुंबईच्या संघाचा सर्वात जुन्या खेळाडूंपैकी एक खेळाडू आहे. 2019 च्या आयपीएल सामन्यात शेवटच्या चेंडूवर यॉर्कर फेकून त्याने संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. एका हंगामात मुंबई संघासाठी सर्वाधिक बळी मिळवून देण्यात तो आतापर्यंत अव्वल ठरला आहे. त्याने 2011 साली संघासाठी 28 बळी मिळवून दिले होते. संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत सर्वाधिक 170 बळी त्याच्याच नावावर आहेत. मात्र 2020 च्या हंगामात तो संघाबाहेर आहे.

जसप्रीत बुमराह- 27 विकेट्स (2020)

जसप्रीत बुमराहने 2020 च्या या संपूर्ण हंगामात मुंबईच्या संघासाठी 27 बळी घेतले आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीत असलेला बुमराह अंतिम सामन्यात मात्र एकही बळी घेऊ शकला नाही. त्यामुळे त्याला ऑरेंज कॅप गमवावी लागली. याशिवाय संघासाठी एकाच हंगामात सर्वाधिक बळी घेण्याच्या विक्रमासाठी देखील त्याला 2 बळी घेणे आवश्यक होते. असे जरी असले तरी तो यंदाच्या हंगामात मुंबईसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. तर संपूर्ण हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत तो रबाडा नंतर दुसऱ्या स्थानी आहे.

ट्रेंट बोल्ट- 25 विकेट्स (2020)

मुंबईच्या संघातून खेळताना ट्रेंट बोल्टने 2020 मध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. संघासाठी या हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे. बोल्टने अंतिम सामन्यातही तीन बळी घेत दिल्लीची खेळी बिघडवून टाकली. या तीन बळींसह त्याने या हंगामात 25 बळी पूर्ण केले आहेत.

लसिथ मलिंगा- 24 विकेट्स (2015)

लसिथ मलिंगाने 2015 मध्येही अव्वल स्थान गाठले होते. या हंगामात त्याने 24 बळी मिळवले होते. चेन्नई सुपर किंग्स संघाचा पराभव करीत मुंबईने या हंगामात आयपीएलचा किताब जिंकला होता. व यामागे लसिथ मलिंगाच्या गोलंदाजीचे मोठे योगदान होते.

मिचॅल जॉनसन- 24 विकेट्स (2013)

मुंबई संघाने आयपीएलचा पहिला किताब जिंकला त्या हंगामात जॉनसन जबरदस्त गोलंदाजी करीत होता. त्याने संपूर्ण हंगामात 24 बळी मिळवले होते. 2017 च्या अंतिम सामन्यातही शेवटच्या षटकात मुंबईला एका धावेने त्याने विजय मिळवून दिला होता. 2020 साठी तो मात्र आयपीएलचा भाग नाहीये.

हरभजन सिंग- 24 विकेट्स (2013)

हरभजन सिंग 2008 पासून 2017 पर्यंत मुंबई इंडियन्सच्या संघाचा महत्त्वाचा खेळाडू होता. त्याने 10 वर्षे मुंबई संघासाठी खेळ केला आहे. 2013 साली त्याने मुंबईसाठी 24 बळी घेतले होते. त्याच्या आयपीएल कारकिर्दीतला हा सर्वात चांगला हंगाम ठरला होता. मागील दोन वर्षे 2018-2019 तो चेन्नईसाठी खेळला होता मात्र 2020 च्या आयपीएल मधून त्याने माघार घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित…रोहित…मुंबई…मुंबई…फायनलमध्ये रोहितचा मुंबईकडून ‘हिट’ विक्रम

आयपीएल फायनलमध्ये १६० धावांपेक्षा कमी धावांचं टारगेट असताना पाहा काय लागलेत निकाल

कहर! एवढी चांगली कामगिरी केलेल्या बोल्टच्या नावावरही झालाय नकोसा विक्रम

ट्रेंडिंग लेख-

प्रतिस्पर्ध्याला दिवसा चांदणं दाखवणारा हा ‘छोटू’ म्हणजे मुंबई इंडियन्सची जान आहे जान!!

दांडीगुल गोलंदाजीचा शेर! मुंबईचा ‘हा’ धुरंधर ठरणार पाचव्या जेतेपदाचा शिल्पकार

मुंबई इंडियन्सचं काळीज! ‘या’ खेळाडूंचं मुंबई संघातील महत्त्व प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाला चांगलंच माहितीये

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---