---Advertisement---

इंग्लंड संघाला मोठा फटका; स्टार खेळाडू संपूर्ण हंगामातून बाहेर! केली जाणार शस्त्रक्रिया

On: गुरूवार, ऑगस्ट 20, 2026 6:40 PM
---Advertisement---

इंग्लंड क्रिकेट संघाला (England Cricket team) एक मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन (Sam Curren out of the tournament) दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे. करनची सध्या सुरू असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु तसे होऊ शकले नाही. आता मांडीच्या (ग्रोइन) दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या या इंग्लिश अष्टपैलू खेळाडूची शस्त्रक्रिया होणार आहे.

त्याने आपला शेवटचा कसोटी सामना जुलै 2021 मध्ये खेळला होता. ‘द हंड्रेड’ स्पर्धा संपल्यानंतर सॅम करनवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे, ज्यामुळे तो संपूर्ण हंगामात इंग्लंडसाठी उपलब्ध असणार नाही. तसेच इंग्लंडचा आणखी एक खेळाडू म्हणजेच विल जॅक्स (Will Jacks) देखील अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेनंतर पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून बाहेर झाला आहे. आता जॅक्सचं पुनरागमन कधी होतं, हे पाहणं चाहत्यांसाठी महत्वाचं ठरणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, सॅम करनच्या मांडीच्या दुखापतीची तपासणी करण्यात आली असून शुक्रवारी त्याची शस्त्रक्रिया होणार आहे. तसेच तो उर्वरित होम हंगामासाठी उपलब्ध असणार नाही. समोर आलेल्या माहितीनुसार, विल जॅक्स सध्या अपेंडिक्स काढण्याच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर सावरत आहे. आम्ही त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत आणि श्रीलंका मालिकेपूर्वी तो खेळण्यास फिट होईल का, याबाबतचा निर्णय घेतला जाईल. असे इंग्लंड क्रिकेट व्यवस्थापनाकडून कळवण्यात आले आहे.

सॅम करनची क्रिकेट कारकीर्द पाहायची झाल्यास, हा इंग्लंडसाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 खेळणारा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 24 कसोटी, 44 एकदिवसीय आणि 80 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या 38 डावांमध्ये त्याने 3 अर्धशतकांच्या मदतीने 815 धावा केल्या आहेत. तसेच कसोटीच्या 42 डावांमध्ये गोलंदाजी करताना करनने 47 विकेट्स घेतल्या आहेत.

एकदिवसीय सामन्यांच्या 33 डावांमध्ये त्याने 2 अर्धशतकांसह 668 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांच्या 44 डावांमध्ये त्याने 43 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. याशिवाय, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 51 डावांमध्ये 2 अर्धशतकांच्या मदतीने 744 धावा केल्या आहेत आणि 75 डावांमध्ये 73 विकेट्स घेतल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---