---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेला धक्का! भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून प्रमुख वेगवान गोलंदाज बाहेर

South Africa Team
---Advertisement---
भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) संघात ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. २६ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. मात्र, त्याआधीच दक्षिण आफ्रिका संघाला जबरदस्त धक्का बसला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्किया (Anrich Nortje) भारताविरुद्धच्या या कसोटी मालिकेतून बाहेर (rule out of the Test Series) झाला आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने (Cricket South Africa) याबद्दल माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेटने दिलेल्या माहितीनुसार दीर्घकाळच्या दुखापतीमुळे (persistent injury) तो भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकणार आहे.

दक्षिण आफ्रिकेने त्याच्याऐवजी कोणत्याही बदली खेळाडूची निवड केलेली नाही. त्यामुळे आता भारताविरुद्ध २० जणांचा दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघ असेल. 

२८ वर्षीय नॉर्किया दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने गेल्या काही काळात दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीची धूरा चांगल्या पद्धतीने सांभाळली होती. तो २०२१ वर्षात दक्षिण आफ्रिकेचा कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने २०२१ वर्षांत ५ कसोटी सामन्यांत २५ विकेट्स घेतल्या आहेत.

नॉर्कियाने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत १२ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २८.१० च्या सरासरीने ४७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी ३ वेळा केली आहे.

नॉर्किया भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर गेल्याने डुआन ऑलिव्हियरला दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघात पुनरागमन करण्याची संधी मिळू शकते. तो २०१९ साली अखेरचा कसोटी सामना खेळला आहे. त्याने आत्तापर्यंत १० कसोटी सामने खेळले असून ४८ विकेट्स घेतल्या आहेत.

आफ्रिदीने विश्वविक्रम केला, तोही सचिनच्या बॅटने | When Sachin Tendulkar Helped Shahid Afridi

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असा आहे दक्षिण आफ्रिका संघ – 
डिन एल्गार (कर्णधार), तेम्बा बावुमा (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), कागिसो रबाडा, सरेल एरवी, ब्यूरन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंड, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, एडेन मार्करम, विआन मल्डर, किगन पीटरसन, रॅस्सी व्हॅन डर दसेन, काइल वेरेन, मार्को जॅन्सन, ग्लेंटन स्टुअरमन, प्रिनेलन सुब्रेन, सिसांडा मॅगाला, रायन रिकेल्टन, डुआन ऑलिव्हियर.

मोठी बातमी – 

शाहरुखचा झंझावात कायम! मेगा लिलावापूर्वी केली आणखी एक वादळी खेळी

भारीच ना!! स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या महिला प्रेक्षकाने टिपला भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

‘तीच गल्ली, तेच लोक, तेच प्रेम…’, आपल्या जन्मगावी पोहोचलेला कैफ जुने दिवस आठवून झाला भावुक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---