---Advertisement---

अंशुल कंबोजसाठी काळा दिवस! आयपीएल इतिहासातील नकोशा रेकॉर्डमध्ये यश दयालसोबत नाव

On: शनिवार, मे 16, 2026 7:41 PM
---Advertisement---

आयपीएल 2026 मधील 59व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज अंशुल कांबोज याच्या नावावर अत्यंत लाजिरवाणे विक्रम नोंदवले गेले. शुक्रवार, 15 मे रोजी झालेल्या सामन्यात अंशुल पूर्णपणे लयीत दिसला नाही. त्याच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी अक्षरशः हल्ला चढवत तब्बल आठ षटकार ठोकले. या कामगिरीमुळे अंशुल आता आयपीएल इतिहासात एका डावात सर्वाधिक षटकार खाणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने यश दयाल याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

लखनऊच्या इकाना स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात 188 धावांचा बचाव करताना अंशुल कांबोजने केवळ 2.4 षटकांत 63 धावा खर्च केल्या. या दरम्यान त्याच्या गोलंदाजीवर तब्बल 8 षटकार ठोकले गेले. विशेष म्हणजे त्याच्या दोन षटकांत प्रत्येकी चार-चार षटकार मारले गेले. यासह तो आयपीएल इतिहासात एका डावात सर्वाधिक षटकार खाणारा गोलंदाज ठरला आहे.

याआधी 2023 मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना यश दयाल यांनी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध एका डावात 8 षटकार खाल्ले होते. त्याच सामन्यात रिंकू सिंगने सलग पाच चेंडूंवर पाच षटकार ठोकत इतिहास रचला होता.

या हंगामात अंशुल कांबोजची कामगिरी मात्र शानदार राहिली होती. 12 सामन्यांत त्याने 19 विकेट घेतल्या असून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भुवनेश्वर कुमार आणि कगिसो रबाडा यांच्या पाठोपाठ तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जला अनेक सामने जिंकून दिले होते.

मात्र इकाना स्टेडियमवरील ही रात्र त्याच्यासाठी काळा अध्याय ठरली. मागील षटकात चार षटकार खाल्ल्यानंतरही कर्णधाराने पुनरागमनाच्या आशेने 17वे षटक त्याच्याकडे सोपवले. पण परिस्थिती आणखी बिघडली आणि निकोलस पूरनने त्याच्या सलग चार चेंडूंवर चार षटकार ठोकत सामना जवळपास संपवून टाकला. अंशुल कांबोजसाठी हा सामना विसरण्यासारखा ठरला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---